शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात? हो? तर मग हा लेख तुम्हाला नक्की मदत करेल. आज आम्ही तुम्हाला कृषी क्षेत्राशी संबंधित फायदेशीर(Agriculture Business Ideas in Marathi) व्यवसाय सांगणार आहोत हे तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता.
आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे.शेती हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आपल्या देशाच्या ग्रामीण भागातील लोकांच्या उपजीविकेचे शेती हे एक प्रमुख साधन आहे.कृषी उद्योग हा सतत वाढ होणार उद्योग आहे.अनेक व्यवसाय संधी यामध्ये उपलब्ध आहेत.
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे मानले जाते.कृषी क्षेत्राचे भारताच्या जिडीपी मध्ये मोठे योगदान आहे.अन्न ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे.त्यामुळे कृषी क्षेत्र हे कोणत्याही देशासाठी प्रमुख क्षेत्र मानले जाते.जोपर्यंत या पृथ्वीवर माणूस अस्तित्वात आहे तोपर्यंत मानवाच्या जीवनात शेतीचे महत्त्व असेल असे मानले जाते.
40+ कृषी आधारित व्यवसाय [2022] | Agriculture Business Ideas in Marathi 2022
सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती ही सध्या लोकप्रिय बनली आहे.सेंद्रिय उत्पादनांची मागणी ही वाढत आहे.रासायनिक खतांचा वापर करून केलेल्या शेतीच्या उत्पादनामुळे आपल्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.त्यामुळे आजकाल लोक सेंद्रिय उत्पादनांना जास्त प्राधान्य देत आहेत.जर तुमच्याकडे शेतजमीन असेल तर हा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता.सेंद्रिय फळे, भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.
दुग्ध उत्पादन
दुग्ध उत्पादन हा भारतातील लोकप्रिय शेती व्यवसायांपैकी एक आहे.दूध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांची मागणी आपल्या देशात जास्त असते.या व्यवसायामध्ये तुम्ही चांगला नफा व्यवसाय तुम्ही शेती सोबत साईड इन्कम म्हणून करू शकता. गाय किंवा म्हैस विकत घेऊन हा व्यवसाय सुरू करता येईल.तुम्ही स्वतःची डेअरी सुरु करू शकता.किंवा तुमचे दूध एखाद्या मोठ्या डेअरी मध्ये विकू शकता.
खते उत्पादन व विक्री
पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि उत्पादन चांगले येण्यासाठी खतांचा वापर केला जातो.जर तुम्हाला खतांची योग्य माहिती असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.हा व्यवसाय तुम्हाला दोन पद्धतीने करता येईल.तुम्ही स्वतः खते बनवून ती बाजारामध्ये विकू शकता.जर तुम्हाला खते बनवण्याबद्दल ज्ञान नसेल तर कमी किमतीमध्ये खते विकत घेऊन योग्य किंमतीत खते विकून तुम्ही नफा कमावू शकता.मोठ्या शहरांतून खते खरेदी करून तुम्ही ग्रामीण भागात ती विकू शकता.
फुलांचे व्यवसाय
आपल्याकडे धार्मिक कार्यक्रमात,समारंभात फुलांची मोठी मागणी असते. फुलांचा व्यवसाय सुरू करणे खूप फायदेशीर आहे. फुलांची मागणी 12 महिने असते. हा व्यवसाय शेती संबंधित भारतातील मोठ्या व्यवसायापैकी मानला जातो.तुम्ही विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेऊ शकता.
मशरूम शेती
हॉटेल, रेस्टॉरंट अशा ठिकाणी मशरूमला खूप मागणी असते.मशरूम पिकाची लागवड करणे सोपे आहे.जगातील बऱ्याच देशांमध्ये मशरूम ला मागणी आहे. मशरूम शेतीचा व्यवसाय कमी गुंतवणुकीने सुरू करता येतो.कमी जागेत तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येईल.मशरूम शेती मधून तुम्ही कमी वेळात पैसे कमावू शकता.मशरूम मध्ये पौष्टिक तत्वे जसे की प्रथिने,व्हिटॅमिन असतात. त्यामुळे याची मागणी पण खूप असते.
कुक्कुटपालनात व्यवसाय
पोल्ट्री व्यवसाय हा शेतीसोबत जोडधंदा म्हणून केला जातो.हा एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे.हे शेती व्यवसायाच्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक मानले जाते. कोंबड्या, बदके, लहान पक्षी, इत्यादी कुक्कुटपालनात पाळले जातात.तसेच अंडी हा सुद्धा या व्यवसायात कमाईचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.
अन्य कृषी संबंधित बिझनेस आयडिया | Agriculture Business Ideas in Marathi
कृषी/पर्यावरण पर्यटन व्यवसाय
औषधी वनस्पती शेती
भाजीपाला लागवड
फळझाडे लागवड व्यवसाय
सेंद्रिय उत्पादनांची विक्री
मस्यपालन व्यवसाय
रोपवाटिका
औषधी वनस्पतींचे दुकान
बागकाम उत्पादनांचे दुकान
पशुधन खाद्य उत्पादन
सेंद्रिय खत निर्मिती
फळांचा रस,जॅम उत्पादन
बियानांचे दुकान
शेतीच्या उपकरणांचे दुकान
बोन्साय शेती
पशुखाद्य पुरवठ्याचे दुकान
दुर्मिळ वनस्पतींची लागवड आणि शेती
द्राक्ष बागेची शेती
शेती उपकरणे आणि पुरवठा दुकान
वृक्ष छाटणे आणि काढणे सेवा
कापूस शेती
अंडी उत्पादन
मेंढी आणि शेळीपालन
शेतकरी आणि खरेदीदारांसाठी ऑनलाइन दुकाने
शेतकरी संबंधी ब्लॉग
लहान शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज केंद्र
सोयाबीन उत्पादन
कृषी दलाली आणि सल्ला सेवा
मधमाशी पालन आणि मध उत्पादन
काजू लागवड आणि प्रक्रिया
भातशेती आणि शेती
चहा आणि कॉफीची लागवड
कीटकनाशक उत्पादन
नारळ आणि पाम तेल शेती
ऊस शेती आणि उत्पादन
गांडूळ खत
कृषी उत्पादने आणि पुरवठा दुकाने
मका लागवड आणि शेती
हरितगृह शेती
निष्कर्ष
या काही कृषी व्यवसाय संबंधित आयडिया होत्या ज्यात तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता.तुमचे बजेट,उपलब्ध जमीन,हवामान,मातीची गुणवत्ता यासारख्या विविध घटकांचा विचार करून तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करू शकता. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, संशोधन करा आणि उत्पादनाची मागणी किती आहे याविषयी पुरेसे ज्ञान मिळवा.तांत्रिक माहिती व कायदेशीर बाबींची माहिती घ्या.
मला अशा आहे की आता तुम्हाला कृषी आधारित व्यवसाय (Agriculture Business Ideas in Marathi) याबाबत ची माहिती आवडली असेल.
जर तुम्हाला कृषी आधारित व्यवसाय(Agriculture Business Ideas in Marathi) बद्दलचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.
हे सुध्दा वाचा :20 बिजनेस आयडियाज
हे सुध्दा वाचा : महिलांसाठी बिझनेस आयडिया