झटपट बासुंदी बनवायला शिका | Basundi Recipe in Marathi
बासुंदी हा दुधापासून बनवला जाणारा गोड स्वादिष्ट पदार्थ आहे. चव वाढवण्यासाठी त्यात सुकामेवा तसेच वेलची आणि जायफळाचा देखील वापर केला जातो. दुधापासून बनवलं जाणारं हे चवदार मिष्टान्न महाराष्ट्र मध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
बासुंदी एक स्वादिष्ट डिश आहे. आपण बासुंदी अंदाजे फक्त 30 मिनिटांत तयार करू शकता. त्यासाठी बनवण्यासाठी तुम्हाला दूध, हिरवी वेलची, साखर आणि केशर लागणार आहे. बरेच लोक बासुंदी पुरीसोबत खातात.
साहित्य
2 लिटर दूध
1 वाटी साखर
4 बदाम
4 पिस्ता
थोडे केशर
2 टीस्पून आरारूट
6 ते 7 बेदाणे
4 ते 5 वेलच्या
थोडे जायफळ
कृती
दूध कढईत ओतून गॅसवर उकळत ठेवावे.
उकळी आल्यावर सतत चमच्याने ढवळत राहावे.
दुधा आटवून 1 लिटर करावे.
नंतर थोड्या थंड दुधात कॉर्नफ्लॉवर मिसळून ते उकळत्या दुधात ओतावे.
दुधाला उकळी येईपर्यंत ढवळत राहावे.
नंतर दुधात साखर,वेलची,जायफळ,बेदाणे,केशर,बदाम,पिस्ता चिरून टाकावेत व दूध चांगले उकळल्यावर गॅस बंद करावा.