क्रिप्टोकरंसी म्हणजे काय?(सोप्या भाषेत) l Cryptocurrency meaning in Marathi

गेल्या एक वर्षात क्रिप्टोकरंसी हा शब्द तुम्हाला नक्की कुठे ना कुठे ऐकायला मिळाला असेल.पण नक्की क्रिप्टोकरंसी म्हणजे काय?(Cryptocurrency meaning in Marathi) या पोस्ट मध्ये मी तुम्हाला याचीच माहिती देणार आहे.

क्रिप्टोकरंसी म्हणजे काय? l Cryptocurrency meaning in Marathi

क्रिप्टोकरन्सी हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आणि क्रिप्टोग्राफीद्वारे सुरक्षित केलेले डिजिटल चलन आहे. ब्लॉकचेन हा एक प्रकारचा डेटाबेसचा आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमात माहितीचा संग्रह आहे.

क्रिप्टोकरंसी हे डिजिटल करेन्सी आहे जे इंटरनेटवर वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहे.क्रिप्टोकरंसीला आभासी चलन(Virtual Currency) असेही संबोधले जाते.

क्रिप्टोकरन्सी ही आपण सर्वजण दररोज वापरत असलेल्या पारंपारिक चलनापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. क्रिप्टोकरन्सी नाणी किंवा नोट नाहीत ज्याला तुम्ही हात लावू शकता.ते केवळ एक आभासी चलन आहे.

क्रिप्टोकरन्सीचे वर्णन विकेंद्रित (Decentralised)असे केले जाते. क्रिप्टोकरन्सी कोणत्याही देशाद्वारे नियंत्रित केल्या जात नाहीत.कोणत्याही देशाचे यावर नियंत्रण नसते.ते विनामूल्य, ओपन सोर्स सॉफ्टवेअर चालवणाऱ्या संगणकांच्या पीअर-टू-पीअर नेटवर्कद्वारे व्यवस्थापित केले जातात.

क्रिप्टोग्राफी (Cryptography) आणि करंसी (Currency) यांच्या संयोगातून (Cryptocurrency) नाव तयार झाले आहे.

क्रिप्टोकरंसी चे प्रकार | Types of Cryptocurrency in Marathi

क्रिप्टोकरन्सीमध्ये लोकांची आवड वाढल्याने, गेल्या काही वर्षांत नवीन क्रिप्टोकरन्सीच्या संख्येत खूप मोठी वाढ झाली आहे. कॉइन मार्केट कॅप च्या म्हणण्यानुसार जगात सध्या आठ हजाराहून अधिक क्रिप्टोकरंसी आहेत.

बीटकॉइन | Bitcoin Information in Marathi

बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी सातोशी नाकामोटो या नावाच्या व्यक्तीने 2009 मध्ये तयार केली होती.ही सर्वात प्रसिद्ध व पहिली क्रिप्टोकरन्सी आहे.बिटकॉइन हे असे डिजिटल चलन आहे जे कोणत्याही नियंत्रणाशिवाय बँक किंवा सरकारच्या देखरेखीशिवाय चालते. बिटकॉईन हे पीअर-टू-पीअर सॉफ्टवेअर आणि क्रिप्टोग्राफीवर अवलंबून आहे.

बिटकॉइन हे ब्लॉकचेन नावाच्या तंत्रज्ञानावर तयार केले गेले आहेत.ब्लॉकचेन हा पब्लिक लेजरचा एक प्रकार आहे. ब्लॉकचेन हे एका वेळी विविध ठिकाणी व्यवहार आणि त्या संबंधित डेटा रेकॉर्ड करण्यासाठी एक डिजिटल प्रणाली आहे.ब्लॉकचेनमधील ब्लॉक्स हे प्रत्येकी एक युनिट्स असतात.त्यामध्ये प्रत्येक व्यवहाराचा डेटा असतो, त्यात तारीख, वेळ,किंमत,खरेदीदार आणि विक्रेता आणि प्रत्येक एक्सचेंजसाठी ओळखणारा कोड समाविष्ट असतो.

लाईटकॉइन | Litecoin Information in Marathi

लाईटकॉइन(Litecoin) या क्रिप्टोकरन्सीची स्थापना Bitcoin नंतर दोन वर्षांनी झाली.चार्ली ली नावाच्या एका अभियंत्याने २०११ मध्ये याची स्थापना केली होती.Litecoin हे ओपन-सोर्स ग्लोबल पेमेंट नेटवर्कवर आधारित आहे.लाईटकॉइन चा पुरवठा निश्चित आहे.चलनात 84 दशलक्ष पेक्षा जास्त लाईटकॉईंस कधीही नसतील.लाईटकॉइन ​​व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी तसेच व्यवहार रेकॉर्ड करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरते.

इथेरियम | Ethereum Information in Marathi

इथेरियम ही सुद्धा सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरंसी पैकी एक आहे.इथेरियम ची स्थापना विटालीक ब्यूटेरिन यांनी 2015 साली केली होती. इथेरियम ही एक मुक्त-स्रोत आणि सार्वजनिक सेवा आहे जी कोणत्याही तृतीय पक्षाशिवाय सुरक्षितपणे स्मार्ट करार आणि क्रिप्टोकरन्सी व्यापार सुलभ करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापरते.जरी सध्या बीटकॉइन ही क्रिप्टोकरंसी सर्वात जास्त लोकप्रिय असली तरी काही तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की भविष्यात इथेरियम बीट कॉइन ला मागे टाकेल.

बीटकॉइन कॅश | Bitcoin Cash Information in Marathi

बीटकॉइन कॅश ही एक क्रिप्टोकरन्सी आहे ज्यात बिटकॉइन सारखीच अनेक वैशिष्टे आहेत.बिटकॉइन कॅश ही विकेंद्रित पीअर-टू-पीअर इलेक्ट्रॉनिक कॅश प्रणाली आहे जी सरकार किंवा वित्तीय संस्था अशा कोणावरही अवलंबून नसते.

बीट कॉइन पासून बीट कॉइन कॅश मध्ये मुख्य बदलांपैकी एक म्हणजे ब्लॉक चा आकार.बीटकॉइन च्या 1MB मर्यादेमुळे व्यवहारात उशीर होत असे, त्यामुळे बीटकॉइन कॅश ने मोठ्या संख्येने व्यवहार करण्यासाठी ब्लॉक साईज वाढवली.बिटकॉइन कॅश ब्लॉकचेन हे मूळ बिटकॉइन च्याच ब्लॉकचेनवर आधारित आहे,परंतु त्यात थोडे वेगळे फरक आहेत.बीटकॉइन वर फक्त 1MB ची ब्लॉक साईज असते,परंतु बीट कॉइन कॅश ची ब्लॉक साईज 32MB एवढी आहे.मोठ्या ब्लॉक साईज मुळे बिटकॉइन कॅशला बिटकॉइनच्या तुलनेत जलद गतीने व्यवहार करण्याची मुभा मिळते.

बीट कॉइन कॅश ची निर्मिती झाल्यानंतर ती क्रिप्टोकरन्सी, बीट कॉइन व इथे रियम यांच्या नंतर तिसरी सर्वात यशस्वी क्रिप्टोकरन्सी बनली होती.

कारडॅनो | Cardano Information in Marathi

कारडॅनो ची स्थापना 2017 साली चार्ल्स हॉस्किन्सन नावाच्या व्यक्तीने केली होती.इतर क्रिप्टोकरन्सी प्रमाणेच, ADA – Cardano हे एक डिजिटल नाणे आहे ज्याचा वापर पैसे पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.ADA क्रिप्टोकरन्सी कार्डानो ब्लॉकचेनवर चालते.कार्डानो ब्लॉकचेन चा वापर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.ऍप्लिकेशन्स् तयार करण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.

डॉजकॉइन | Dogecoin Information in Marathi

डॉजकॉइन ही बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी 2013 साली तयार केलेली एक क्रिप्टोकरन्सी आहे.ही क्रिप्टोकरन्सी केवळ एक जोक म्हणून सुरु केली गेली होती.

इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणे,डॉजकॉइन लोकांमध्ये पैसे देवाणघेवाण करण्याचा मार्ग म्हणून काम करू शकतो.जसे की एखादी वस्तू किंवा सेवांसाठी देय म्हणून काम करू शकते.किंवा कॅश म्हणून सुद्धा पाठवले जाऊ शकते.आणि कोणत्याही मध्यस्थीशिवाय ते करता येते.बीटकॉइन या क्रिप्टोकरन्सीप्रमाणे डॉजकॉइन सुद्धा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर चालते.ब्लॉकचेन हे वितरित आणि सुरक्षित डिजिटल लेजर आहे जे क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले सर्व व्यवहार एकत्र संग्रहित करून ठेवते.

क्रिप्टोकरंसी चे फायदे | Advantages of Cryptocurrency in Marathi

पारदर्शकता

क्रिप्टोकरंसीमध्ये सामाजिक बदल घडवण्याची खूप मोठी क्षमता आहे असे मानले जाते.याचे प्रमुख कारण म्हणजे पारदर्शकता.क्रिप्टोकरंसी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत त्यामुळे कोणीही कधीही व्यवहाराचा डेटा पाहू शकतो.ज्या लोकांना अधिक पारदर्शक अशी आर्थिक व्यवस्था हवी आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला फायदा असू शकतो.

उपलब्धता

कधीही व कुठल्याही ठिकाणावरून क्रिप्टोकरंसी गुंतवणूक करता येऊ शकते.आजकाल बरेच मोबाईल ऍप उपलब्ध आहेत ज्यावरून तुम्ही क्रिप्टोकरंसी खरेदी विक्री करू शकता.

गोपनीयता व सुरक्षा

क्रिप्टोकरन्सीसाठी गोपनीयता आणि सुरक्षितता महत्त्वाचा विषय आहे.ब्लॉकचेन लेजर वेगवेगळ्या पझल्स वर अवलंबून असते, ज्यांना डिकोड करणे खूप कठीण असते.त्यामुळे इलेक्ट्रॉनिक व्यवहारांपेक्षा क्रिप्टोकरन्सी व्यवहार अधिक सुरक्षित असतात.

विकेंद्रित

क्रिप्टोकरन्सीचा एक प्रमुख फायदा म्हणजे ते प्रामुख्याने विकेंद्रित आहेत.विकेंद्रीत असल्याने चलनाची मक्तेदारी कोणाकडे ही नसते. कोणतीही एक संस्था नाण्याचे मूल्य व किंमत ठरवू करू शकत नाही.

क्रिप्टोकरंसी चे नुकसान | Disadvantages of Cryptocurrency in Marathi

बेकायदेशीर कामांसाठी वापर

क्रिप्टोकरंसी या अधिक खासगी व गोपनीय असल्याने क्रिप्टोकरंसी वापरून बेकायदेशीर कामांसाठी केलेल्या गोष्टींचे माहिती करणे कठीण असते. बीट कॉइन हा अनेकदा बेकायदेशीर कामांसाठी पेमेंट म्हणून वापरला गेला आहे.

अस्थिरता

क्रिप्टोकरन्सी या अत्यंत अस्थिर मानल्या जातात.त्यांच्या किंमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व घट होत असते.इतर मालमत्ता व गुंतवणुकी पेक्षा क्रिप्टोकरन्सी अधिक अस्थिर असल्याने,जोखीम देखील अधिक असते.

निसर्गावर परिणाम

क्रिप्टोकरन्सी मायनिंग ही संगणकीय कोडे सोडवून नवीन क्रिप्टोकरन्सी तयार करण्याची एक प्रक्रिया आहे. मायनिंग साठी मोठ्या प्रमाणात वीज व संगणक शक्ती लागते.त्यामुळे ऊर्जेची भरपूर प्रमाणात गरज लागते.

हॅकिंग

जरी क्रिप्टोकरन्सी खूप सुरक्षित आहेत, एक्सचेंजेस इतके सुरक्षित नसू शकतात.हॅकिंग च्या अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामुळे अनेकांचे पैसे डूबले.

निष्कर्ष

क्रिप्टोकरन्सी ही एक नवीन आणि क्रांतिकारी संकल्पना आहेत.क्रिप्टोकरन्सी बद्दल सध्या जगात संशोधन चालू आहे.अनेकजण क्रिप्टोकरन्सी बद्दल आपली मते व्यक्त करत असतात.गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करत आहेत.

क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक करण्याचा विचार करण्यापूर्वी क्रिप्टोकरन्सी बद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. क्रिप्टोकरन्सीचे काही पैलू आहेत ज्यांचा शोध घेणे बाकी आहे.गेल्या काही वर्षात क्रिप्टोकरन्सी खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध झाल्या आहेत.अनेकांनी पैसे कमावले आहेत.परंतु अपुरी माहिती किंवा शून्य माहिती असल्याने अनेकांनी पैसे गमावले देखील आहेत.

जर तुम्हाला क्रिप्टोकरंसी म्हणजे काय?(Cryptocurrency meaning in Marathi)ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.

जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.

Leave a Comment