ड्रॉपशिपिंग म्हणजे काय? | What is Dropshipping in Marathi

जर तुम्ही ऑनलाइन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल किंवा ई-कॉमर्स बद्दल तुम्हाला माहिती असेल तर शक्यता आहे की तुम्ही ड्रॉपशिपिंगची बद्दल ऐकले असेल.जर नसेल ऐकले तरी काळजी करू नका ड्रॉपशिपिंग म्हणजे काय? (What is Dropshipping in Marathi) याबद्दल या पोस्ट मध्ये तुम्हाला माहिती मिळेल.

ड्रॉपशीपिंग हा एक कमी रिस्क असलेले ऑनलाइन व्यवसाय आहे.जे तुम्हाला दररोज काही तासांच्या कामासह 0 ते हिरो बनविण्यात मदत करू शकते.या व्यवसायात तुम्हाला त्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता नाही.

आजकाल लोक ऑनलाईन शॉपिंग कडे वळले आहेत.यामुळे ई- कॉमर्स व्यवसाय हा खूप विकसित झाला आहे.

ई-कॉमर्स व्यवसायात प्रवेश करणाऱ्या अनेक लोकांसाठी ड्रॉपशिपिंग चांगला व्यवसाय ठरत आहे. त्याची लोकप्रियता वाढत आहे.चला तर मग ड्रॉपशिपिंग बद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

ड्रॉपशिपिंग म्हणजे काय? | What is Dropshipping in Marathi?

ड्रॉपशिपिंग म्हणजे एक असा व्यवसाय आहे ज्यात उत्पादनं किंवा सेवा आपल्या स्टोअर हाऊस मध्ये न ठेवता ह्यात ग्राहकाकडून आलेली ऑर्डर ही आपल्या सप्लायर्स कडे दिली जाते व सप्लायर्स पुढे पॅकिंग आणि शिपिंग , डिलीवरी ची जबाबदारी घेवून ग्राहकांना ऑर्डर नुसार उत्पादनं पोहोचवतात.

ड्रॉपशीपर्स हे पुरवठादार आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात.ऑर्डर मिळाल्यावर, ते ऑर्डरची माहिती पुरवठादारांना देतात. त्यानंतर पुरवठादार हे त्यांच्या गोदामातून उत्पादन ग्राहकांना पाठवतात.

उद्योजकांसाठी ड्रॉपशिपिंग उत्तम आहे कारण या मध्ये स्टोअर चालवताना पारंपारिक स्टोअर चालवण्यासाठी जेवढे भांडवल लागते तेवढे भांडवल ड्रॉपशिपिंग मध्ये आवश्यक नसते.परंतु लक्षात घ्या की, ड्रॉपशिपिंग व्यवसाय मॉडेल ही लगेच श्रीमंत होण्याची योजना नाही.आपण योग्य रीतीने काम केल्यास ड्रॉपशीपिंग आपल्याला यशस्वी व्यवसाय तयार करण्यात मदत करू शकते.

ड्रॉपशिपिंग चे फायदे | Benifits of Dropshipping in Marathi

कमी गुंतवणूक

ड्रॉपशिपिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला व्यवसायाच्या अनुभवाची आवश्यकता नाही.ड्रॉपशिपिंग व्यवसाय सुरू करणे सोपे आहे.यात इतर प्रकारच्या व्यवसाय सुरू करण्याच्या तुलनेत खर्च कमी आहेत. तुम्हाला उत्पादने साठवण्यासाठी जागेची गरज नाही.आणि मदत करण्यासाठी टीमची गरज नाही.तुम्हाला शिपिंगबद्दल देखील काळजी करण्याची गरज नाही.

ऑफिसची गरज नाही

या व्यवसायात स्वतःचे ऑफिस टाकण्याची गरज लागत नाही. फक्त तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर त्यावरून तुम्ही संपूर्ण व्यवसाय सुरू शकता. आणि तुम्हाला मोठी पैशाची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही.जाहिरात करण्यासाठी फक्त तुम्हाला थोडा खर्च येईल.त्यामुळे व्यवसायात वाढ होईल.

वेळेचे बंधन नाही

या व्यवसायाचा सर्वात मोठा फायदा हा आहे.तुम्ही तुमचे स्वतःचे बॉस होऊ शकता.आणि म्हणूनच हा व्यवसाय करण्याचे अनेक जण ठरवतात.लॅपटॉप वरून घरबसल्या व हव्या त्या वेळेत हा व्यवसाय तुम्हाला करता येईल.स्वतःच्या वेगाने व मनाप्रमाणे काम करत येते.

ड्रॉपशिपिंग लवचिक देखील आहे कारण ते तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःचे निर्णय घेण्यासाठी परवानगी देते. तुम्हाला हवे ती उत्पादने तुम्ही तुम्ही सहजपणे निवडू शकता.तुम्ही बिजनेस स्ट्रेटर्जी यावरही तुमचे नियंत्रण असते.

ड्रॉपशिपिंग चे नुकसान | Disadvanges of Dropshipping in Marathi

कमी फायदा (मार्जिन)

ड्रॉपशिपिंगच मध्ये सुरुवातीला वस्तूंवर कमी मार्जीन मिळते.जर तुम्ही अश्या वस्तूंची ड्रॉपशिपिंग करत असाल ज्यामध्ये स्पर्धा जास्त असेल तर या प्रॉब्लेम ला तुम्हाला सामोरे जावे लागेल.पण जर स्पर्धा कमी असेल तर जास्त मार्जिन मिळण्याची शक्यता देखील असते.शिवाय या व्यवसायात मेहनत पण थोडी कमी आहे आणि म्हणूनच नफा पण थोडा कमी असू शकतो.

ऑर्डर्स संबंधित प्रक्रिया

ग्राहक वस्तू ऑर्डर करतो, तुम्ही प्रक्रिया करता आणि तुमचा पुरवठादार पूर्ण करतो.अशी सरळ प्रक्रिया वाटते.पण कधी कधी असे होते की जर तुम्ही एका पेक्षा अधिक पुरवठादारांकडून उत्पादने पाठवत असाल,तर तुम्हाला काही समस्या येऊ शकतात.

तुमचे प्रत्येक पुरवठादार कदाचित वेगवेगळे शिपींग पद्धत वापरू शकतात,ते तुमच्या ग्राहकांसाठी समस्या ठरू शकते.वेगवेगळ्या पुरवठादारांची बिलिंग पद्धत वेगळी असू शकते याचीदेखील तुम्हाला दक्षता घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या पुरवठादारांशी संवाद ठेवावा लागेल.जे कधी कधी थोडे अवघड ठरू शकते.

संपूर्ण नियंत्रण नाही

ड्रॉपशिपिंग व्यवसायात काही प्रक्रियांमध्ये तुमचे नियंत्रण नसते.हा एक तोटा आहे. उत्पादने साठवणे, ऑर्डर पूर्ण करणे आणि शिपिंग हे तुमच्या नियंत्रणात नसते.या गोष्टी व्यवस्थित काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पुरवठादारांवर अवलंबून राहावे लागते. नियंत्रण नसल्यामुळे व्यावसायिकांना हे त्रासाचे ठरू शकते.

ड्रॉपशिपिंग कसे काम करते? | How Dropshipping works in Marathi?

आपण ड्रॉपशिपिंग म्हणजे काय?(Dropshipping in Marathi), त्याचे फायदे व नुकसान बघितले,आता ते कसे कार्य करते हे पाहूया.एक यशस्वी ड्रॉपशीपिंग अनेक पक्षांवर अवलंबून असते.आणि हे तीन मुख्य पक्षांमध्ये विभागले जाऊ शकते.

  • उत्पादक (Manufacturers): हे उत्पादने तयार करतात. तयार केलेली उत्पादने घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात विकतात.
  • घाऊक विक्रेते(Wholesalers): हे उत्पादकांकडून उत्पादने विकत घेतात आणि नंतर किरकोळ विक्रेत्यांना विकण्यापूर्वी त्यांना चिन्हांकित करतात. घाऊक विक्रेते विविध उत्पादकांकडून उत्पादनांचा साठा करतात.
  • किरकोळ विक्रेते (Retailers): विशिष्ट प्रकारच्या उत्पादनासाठी पुरवठादार शोधतो.आणि त्यानंतर किरकोळ विक्रेते थेट जनतेला उत्पादने विकतात.किरकोळ विक्रेता हा उत्पादन आणि ग्राहक यांच्यातील अंतिम टप्पा असतो.किरकोळ विक्रेते ऑनलाइन स्टोअर उपलब्ध करतात ज्यावरून ग्राहक उत्पादने खरेदी करतात.

तुम्ही उत्पादकांकडून थेट खरेदी करू शकता, परंतु त्याऐवजी पुरवठादारांकडून खरेदी करणे बरेच सोपे मानले जाते.कारण यात तुम्हाला जास्त फायदा होतो.ग्राहक तुम्हाला(किरकोळ विक्रेत्याला) वस्तूंची ऑर्डर देतो.तुम्ही ड्रॉप शिपिंग पार्टनरला म्हणजेच जो उत्पादन ग्राहकाला पाठवतो त्याला माहिती देता आणि तो उत्पादन ग्राहकाला पॅकेज करून पाठवतो.त्याबद्दल ड्रॉपशिपिंग भागीदार (तुमचा पुरवठादार) तुमच्याकडून (किरकोळ विक्रेत्याकडून) शिपिंग सेवेसाठी शुल्क आकारतो. तुम्ही ग्राहकाकडून शुल्क आकारता.अशा प्रकारे नफा कमवला जातो.

निष्कर्ष

ड्रॉपशिपिंग करणे सुरुवातीला गुंतागुंतीचे वाटू शकते, परंतु एकदा आपण ड्रॉपशिपिंग कसे करावे हे शिकल्यानंतर, ही एक सोपी प्रक्रिया आहे.कोणताही व्यवसाय सुरू करताना मेहनत तर घ्यावीच लागते तसे या व्यवसायाचे ही आहे .सुरुवातीला तुम्हाला अडचणी येऊ शकतात पण एकदा तुम्ही शिकल्यावर चांगले पैसे कमावू शकता.

ड्रॉपशिपिंग सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही व्यवसायाच्या अनुभवाची आवश्यकता नाही.तुम्हाला जर अनुभव असेल तर या व्यवसायात तुम्हाला मदत होऊ शकते पण अनुभव पाहिजेच असे काही नाही.

ड्रॉपशिपिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही एक चांगली योजना तयार करा.आणि तुमची सुरुवात करा.

जर तुम्हाला ड्रॉपशिपिंग म्हणजे काय?(What is Dropshipping in Marathi) ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.

जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.

Leave a Comment