इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे? 6 सोप्या टिप्स | How to Select Share for Intraday in Marathi

इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे ? | How to Select Share for Intraday in Marathi

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवशी शेअर ची खरेदी व विक्री करणे.

शेअर बाजारात, जेव्हा शेअर्सची खरेदी आणि विक्री एका दिवसामध्ये केली जाते, त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. शेअर मार्केट सकाळी 9:15 वाजता उघडतो आणि 3:30 वाजता बंद होतो. या वेळेमध्ये, जर तुम्ही शेअर्स खरेदी केले तर आणि तुम्ही ते विकल्यास त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात.

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे मिळविण्यासाठी, तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की इंट्राडे ट्रेडिंगसाठी शेअर कसे निवडायचे?(How to Select Share for Intraday in Marathi).इंट्राडे ट्रेडिंगसाठी चांगले स्टॉक निवडून तुम्ही कमी वेळेत चांगले पैसे कमवू शकता.

कमी काळासाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी इंट्राडे ट्रेडिंग हा चांगला पर्याय आहे.येथे एकाच दिवसात शेअरची खरेदी आणि विक्री करून भरपूर नफा कमावता येतो. यासाठी योग्य शेअर्स ची निवड करणे गरजेचे ठरते. 

परंतु बरेच लोक इंट्राडे ट्रेडिंग मध्ये नफा मिळवत नाहीत आणि उलट स्वतःचे नुकसान करतात. कारण ते इंट्राडे ट्रेडिंगसाठी चांगले आणि योग्य शेअर(Intraday Trading stocks in Marathi) निवडत नाहीत.

आज मी तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग च्या काही टिप्स(Intraday Trading tips in Marathi) सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही इंट्राडेसाठी चांगला स्टॉक निवडू शकता.

इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे ? | How to Select Share for Intraday in Marathi

इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे – लिक्विडिटी

इंट्राडे ट्रेडिंगसाठी, तुम्ही उच्च लिक्विडिटी असलेले स्टॉक्स निवडा.कमी लिक्विडिटी असलेले शेअर निवडू नये.

लिक्विडिटी म्हणजे कोणताही शेअर कधीही सहज खरेदी-विक्री करता येतो. म्हणजेच तुमच्याकडे जे काही शेअर्स आहेत, ते योग्य वेळी विकून सहजपणे पैसे मिळवता येतात.शेअरची जितकी जास्त लिक्विडीटी असेल तितक्या सहजतेने खरेदी आणि विक्री करता येते.शेअरची लिक्विडीटी जितकी कमी असेल तितके शेअर विकणे आणि खरेदी करणे अधिक कठीण होईल.

इंट्राडे ट्रेडिंगसाठी चांगल्या लिक्विडिटी चे शेअर निवडल्यामुळे नफा झाल्यावर शेअर विक्री करणे सोपे होते.

जर शेअर विकत घेणारे कमी लोक असतील, तर तुम्हाला जेव्हा शेअर विकायचा असेल तेव्हा तुम्हाला खरेदीदार सापडणार नाही. म्हणूनच इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्ही फक्त अधिक लिक्विड स्टॉक्समध्येच ट्रेडिंग करा.

इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे – मिडीयम वोलाटिलिटी

तुम्ही असे शेअर्स निवडावे ज्यात मध्यम वोलाटिलिटी म्हणजे अस्थिरता आहे.

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे मिळवण्यासाठी, शेअर च्या किमतीमध्ये उतार चढाव आवश्यक आहे. त्यामुळेच अशा शेअर्सची निवड करणे आवश्यक आहे ज्यामध्ये मध्यम अस्थिरता आहे. जर तुम्ही असे शेअर्स निवडले की ज्यांच्या किमतीत फारशी हालचाल नाही तर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये चांगले पैसे कमावता येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मध्यम अस्थिरता असलेले शेअर्स निवडा.

उच्च अस्थिरता(High Volatility) असलेल्या शेअर मध्ये जोखीम जास्त असते. जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत असाल तर तुम्ही उच्च अस्थिरतेचे शेअर देखील निवडू शकता. पण माझे मत असे आहे की तुम्ही अशा शेअर पासून दूर राहावे.

तज्ज्ञांच्या मते असे शेअर्स निवडावे की ज्यांच्या किंमतींमध्ये सरासरी दररोज किमान 3 टक्के वोलाटिलिटी असेल.

इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे – मार्केट ट्रेंड्स

शेअर मार्केट मध्ये बरेचसे शेअर असे असतात की ते मार्केटच्या ट्रेंडनुसार चालतात. म्हणजेच, जेव्हा मार्केट वर जातो तेव्हा ते वर जातात आणि जेव्हा मार्केट खाली जातो तेव्हा ते खाली जातात.

मार्केट ट्रेंड अनेकदा शेअर चा किमतीची हालचाल ठरवतात. जेव्हा मार्केट तेजीत असेल तेव्हा वाढण्याची क्षमता असलेला शेअर निवडा. इंट्राडे ट्रेडर म्हणून, तुम्ही मार्केट ट्रेंडनुसार चालणारे शेअर निवडा.

अशा शेअर्स मधून पैसे कमविण्याची शक्यता जास्त आहे. कारण ते कधी कधी संपूर्ण मार्केटपेक्षा सरासरी वाढीपेक्षा जास्त देखील वाढतात.

इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे – टेक्निकल एनालिसिस

टेक्निकल एनालिसिस मध्ये कोणत्याही शेअर च्या किमतीची हालचाल पाहून, शेअर ची किंमत वरती जाईल की खाली याचा अंदाज लावला जातो.जर तुम्हाला चांगला इंट्राडे ट्रेडर बनायचे असेल तर तुम्ही टेक्निकल एनालिसिस अवश्य शिकावे.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी टेक्निकल एनालिसिस चा (तांत्रिक विश्लेषण) वापर केला जातो. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तुम्ही शेअरच्या किमतीची हालचाल, ट्रेंड, ट्रेडिंग व्हॉल्यूम शोधू शकता.

यूट्यूब चॅनल, वेबसाइट किंवा कोणताही कोर्स करून तुम्ही टेक्निकल एनालिसिस शिकू शकता.

इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे – शेअर मार्केट न्यूज

जर एखाद्या कंपनीशी संबंधित काही चांगली बातमी असेल, तर त्याचा शेअर वाढू शकतो, जर बातमी वाईट असेल तर शेअर पडूही शकतो.

जर एखाद्या शेअर शी संबंधित काही चांगली बातमी येणार असेल, तर बातमी येण्यापूर्वी तुम्ही शेअरचे पैसे गुंतवू शकता. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीने लाभांश जाहीर केला किंवा तिमाही निकाल जाहीर केला किंवा इतर कोणतीही घोषणा केली, तर तिच्या शेअर्समध्ये वाढ दिसू शकते.

कंपन्यांच्या शेअर्सवर सरकारी घोषणा, बजेट घोषणा, आरबीआयच्या घोषणा इत्यादींचाही परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही शेअर मार्केट शी संबंधित बातम्याही पहाव्यात.ज्यामधून तुम्ही शेअर मार्केट बद्दल अपडेट राहाल.

इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे – टार्गेट सेट करा


शेअर खरेदी करण्याआधी तुम्ही हे ठरवा की, तुम्हाला शेअर कोणत्या भावात खरेदी करायचा आहे. आणि कोणत्या भावात विकायचा आहे. त्यामुळे टार्गेटवर शेअर पोहचताच लगेच बाजारातून नफा कमवून बाहेर पडणे सोपे पडते.

निष्कर्ष – इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे ? | How to Select Share for Intraday in Marathi

इंट्राडे ट्रेडिंगसाठी योग्य आणि चांगले शेअर निवडून, तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणे धोकादायक असू शकते परंतु योग्य पद्धत आणि मानसिकतेने, तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता.

मला अशा आहे की तुम्हाला इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे ?(How to Select Share for Intraday in Marathi) माहिती आवडली असेल.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.

जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.

  • हे सुद्धा वाचा

ट्रेडिंग म्हणजे काय?कशी शिकावी? संपूर्ण माहिती

Leave a Comment