मठ्ठा हे मुख्यतः उन्हाळ्यात प्यायले जाणारे थंडगार पेय आहे. उन्हाळ्यात आपले शरीर हायड्रेटेड ठेवणे आणि पचनास मदत करणारे हे मठ्ठा उत्तम पेय आहे.मठ्ठा तुम्ही दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर किंवा साधारणपणे दिवसाच्या कोणत्याही वेळी घेऊ शकता. हे पचनास मदत करते आणि पोटासाठी खूप हलके असते.
मठ्ठा बनवण्याची ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्हाला फक्त सर्व साहित्य घालून मिक्स करावे लागेल आणि मठ्ठा पेय तयार आहे!
साहित्य
5 वाट्या ताक,1 हिरवी मिरची,किंचित आले,कोथिंबीर,अर्धा टीस्पून मीठ,
कृती
आले व मिरची वाटून तो ताकामध्ये टाकावा.
चवीपुरते मीठ घालावे.चवीपुरती साखर घालावी.
कोथिंबीर चिरून घालावी.
त्यानंतर मठ्ठा थंडगार होण्यासाठी फ्रिज मधे ठेवावा.