QR कोड म्हणजे काय? | What is QR Code in Marathi
आजकाल आपल्याला अनेक ठिकाणे जसे की किराना दुकान, मॉल, हॉस्पिटल येथे QR कोड दिसतात.पण हे QR कोड म्हणजे नक्की काय?, ते कसे काम करतात याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगनार आहे.
QR कोड म्हणजे काय? | What is QR Code in Marathi
QR कोड या शब्दाचा फूल फॉर्म क्विक रिस्पॉन्स कोड (Quick Response Code) आहे. QR कोड हे चौरसआकृती बारकोड (2-D बारकोड) असतात.QR कोड जपानमध्ये सर्वप्रथम विकसित केले गेले आणि वापरले गेले होते.QR कोड हा मशीन-वाचनीय माहिती संग्रहित करण्याचा एक मार्ग आहे.
QR कोडमध्ये विविध प्रकारचा डेटा आपण समाविष्ट करू शकतो.जसे की एखादा मजकुर,वेबसाईट,ईमेल अॅड्रेस, फोन नंबर.
चौरसकृती जागेत काळे ठिपके आणि पांढऱ्या स्पेसचे नमुने वापरून QR कोड डेटा संग्रहित करतात.आपण कॅमेरा किंवा स्कॅनर च्या मदतीने हे नमुने स्कॅन करू शकतो.स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्यातील माहिती समजते.QR कोड स्कॅन करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा.स्मार्टफोन मध्ये QR कोड स्कॅन साठी असलेला ऍप आपण वापरू शकतो.
QR कोड हा बार कोडमध्ये असलेल्या माहितीपेक्षा जास्त माहिती देतो. बारकोड मधील डेटा हा 1-D मध्ये असतो तर QR CODE मधील डेटा 2-D मध्ये.QR कोडचा मोठा फायदा म्हणजे आपण त्यामध्ये हजारो अक्षरांचा डेटा समाविष्ट करू शकतो.बारकोड मध्ये जास्तीत जास्त 20 अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर असू शकतात.
QR कोड कसा काम करतो? | How QR Code Works in Marathi
QR कोड ला आपण एक प्रकारची भाषा समजू शकतो.माणूस ही भाषा समजू शकत नाहीत पण मोबाईल डिवाइस, स्कॅनर ही भाषा समजू शकतात.मॉड्यूल हे QR कोडचे मूलभूत घटक असतात.मॉड्यूल म्हणजे काळे-पांढरे ब्लॉक्स असतात ज्यामध्ये डेटा साठवलेला असतो.
QR कोड बारकोड सारखाच काम करतो.प्रत्येक QR कोडमध्ये काळे चौरस आणि ठिपके असतात ज्यामध्ये विविध माहिती साठवलेली असते.मोबाईल मधील ऍप वापरून किंवा स्कॅनर ने स्कॅन केल्यावर,QR कोड मधील माहिती आपल्याला समजेल अशा रुपात दिसते.ही सगळी प्रक्रिया अगदी काही सेकंदात होते.
QR कोड चे प्रकार | Types of QR Code in Marathi
QR कोड चे मुख्य दोन प्रकार पडतात.
1. स्थिर QR कोड (Static QR Code)
यामध्ये असे असते की एकदा आपण कोड जनरेट केला की त्यातील माहिती ही फिक्स आणि न बदल करता येणारी असते.जितकी अधिक माहिती यामध्ये साठवली जाईल तितका जास्त दाट QR कोड तयार होईल.
स्टॅटिक QR कोड मध्ये आपण खालील माहिती साठवू शकतो.
- वेबसाईट लिंक
- मजकूर
- मोबाईल नंबर
- वायफाय नेटवर्कची माहिती
- एसएमएस
- कॅलेंडर इव्हेंट
- ईमेल आयडी
2.गतिमान QR कोड (Dynamic QR Code)
डायनॅमिक QR कोड मध्ये आपण सहजपणे QR कोडचा प्रकार अपडेट करू शकतो तसेच एडिट आणि बदलू शकतो.डायनॅमिक QR कोड हा बिझनेस व मार्केटिंग साठी चांगला मानला जातो.डायनॅमिक QR कोड हा QR कोडमध्ये लिंक देण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.
डायनॅमिक QR कोड मध्ये आपण डेटा म्हणून फक्त लिंक टाकू शकतो.आपण डेटा म्हणून टाकलेली लिंक ही डिरेक्ट त्यात दिलेली नसते त्याऐवजी एक दुसरी लिंक दिलेली असते.ती लिंक यूजर ला आपण दिलेल्या लिंक वर पाठवते.
QR कोड चे उपयोग | Uses of QR Code in Marathi
QR कोड हे विविध प्रकारची माहिती साठवू शकतात, त्यामुळे आपण QR कोड अनेक उद्देशांसाठी वापरू शकतो.
मजकूर -एखादा मजकूर आपण पाठवू शकतो.
फोन नंबर -आपला किंवा आपल्या कंपनीचा फोन नंबर आपण देऊ शकतो.
पत्ता- पत्ता पाठवू शकतो.
लिंक – एखाद्या वेबसाईट ची लिंक देऊ शकतो.
पेमेंट्स – QR कोड आपल्या बँक खाते किंवा क्रेडिट कार्डबद्दल माहिती साठवू शकतात.
वायफाय- वायफाय चा पासवर्ड,अन्य माहिती साठवू शकतो.
- सायबर सुरक्षा म्हणजे काय?
- ब्लॉक चेन म्हणजे काय?
- टॉप प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या आहेत?
- डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
निष्कर्ष
मला अशा आहे की आता तुम्हाला QR कोड म्हणजे काय?(What is QR Code in Marathi) याबाबत ची माहिती आवडली असेल.
जर तुम्हाला QR कोड म्हणजे काय?(What is QR Code in Marathi) बद्दलचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.