महिलांसाठी 10+ बेस्ट बिझनेस आयडिया | Business Ideas for Ladies in Marathi 2022
भारत प्रगतीकडे वाटचाल करत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये महिला उद्योजकांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे. अनोख्या आयडिया, दृष्टी आणि भविष्यासाठी कौशल्ये असलेल्या हजारो महिला आहेत ज्या बिझनेस करत आहेत.
आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.बिझनेसही चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत.कोणतीही स्त्री व्यवसाय सुरू करू शकते.त्यासाठी सुरू केलेल्या कामाबद्दल ज्ञान आणि संशोधनाची गरज आहे.तसेच योग्य दिशेने काम केले पाहिजे.
व्यवसाय कसा सुरू करायचा याची पहिली पायरी म्हणजे कोणता व्यवसाय(Business ideas Marathi) सुरु करायचा.आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये महिलांसाठी बिझनेस आयडिया (Business Ideas for Ladies in Marathi) सांगणार आहोत.यातील एखादी आयडिया निवडून तुम्ही बिझनेस सुरु करू शकता.
महिलांसाठी बिझनेस आयडिया | Business Ideas for Ladies in Marathi 2022
1) ब्युटी पार्लर I Business Ideas for Ladies in Marathi – Beauty Parlour
ब्युटी पार्लर हा फायदेशीर व्यवसाय आहे जो तुम्ही सुरु करू शकता.बहुतेक महिला या ब्युटी पार्लर मध्ये जातात. पुरुषही ब्युटी पार्लर चा वापर करतात.हा भविष्यात वाढणारा व्यवसाय आहे. बहुतेक वयोगटातील ग्राहकांना आकर्षित करतो.लहान मुलींपासून ते महिलांपर्यंत, ब्युटी पार्लर आणि सलून मोठ्या प्रमाणावर वापरकर्ते आहेत.
शहराबरोबरच गावातही हा व्यवसाय चांगला चालू शकतो.हा व्यवसाय तुम्ही कमी पैश्यात घरातही सुरु करू शकता.आजकाल ब्युटी पार्लर चे विविध कोर्स उपलब्ध आहेत जे शिकून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.
2) अगरबत्ती व मेणबत्ती I Business Ideas for Ladies in Marathi – Agarbatti & Mentbatti Making
घरात ,मंदिरात व अन्य ठिकाणी धार्मिक कार्यात अगरबत्तीला चांगली मागणी असते.तसेच अगरबत्ती ची मागणी ही वर्षभर बाजारात असते.मेणबत्तीची ही बाजारात मागणी चांगली आहे.बर्थ डे पार्टी, लग्न,कार्यक्रम यामध्ये मेणबत्त्याचा वापर केला जातो.हा व्यवसाय तुम्हाला कमी पैश्यात सुरु करत येईल.
अगरबत्ती व मेणबत्ती उत्पादनाचा व्यवसाय खूपच फायदेशीर आहे.तुम्ही काही लहान यंत्रसामग्री आणि उपकरणांसह हा उत्पादन व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकता.
3)साबण बनवणे | Business Ideas for Ladies in Marathi – Soap Making
साबण करोडो लोक दररोज वापरतात.आजकाल लोक कारखान्यांमध्ये आणि कृत्रिम पद्धतीने तयार होणाऱ्या साबणांपेक्षा नैसर्गिक आणि आयुर्वेदिक साबणांना प्राधान्य देतात.त्यामुळे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक साबणांना बाजारात चांगली मागणी आहे. तुमचा घरातूनच व्यवसाय करण्याचा विचार असेल तर साबण बनवणे या व्यवसायाचा तुम्ही विचार करू शकता.योग्य ती लायसेन्स घेऊन सुरुवात करू शकता.
4) आचार पापड I Business Ideas for Ladies in Marathi – Aachar Papad Making
आचार व पापड हे असे खाद्यपदार्थ आहेत, जे तुम्हाला बहुतेक घरात आढळतील. सन,लग्न,व अन्य समारंभात आचार पापड यांची चांगली मागणी असते.हा व्यवसाय महीलांसाठी एक चांगला पर्याय आहे.कमी पैशात व घरातूनच याची सुरुवात करता येईल.
5)शिवणकाम I Business Ideas for Ladies in Marathi – Tailoring
जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर आवडीला तुम्ही व्यवसायामध्ये बदलू शकता.
जरी काही टेलर तुमच्या परिसरात आधीच टेलरिंग सेवा देत असतील तरी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. महिला नेहमी चांगल्या टेलरिंग सेवा शोधतात.त्यामुळे जर तुम्ही चांगली सेवा दिली तर ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील. हा व्यवसाय गृहिणी आणि महिलांसाठी चांगला मार्ग आहे ज्यांना पैसे कमावून आपले कुटुंब चालवायचे आहे.
6)युट्युब चॅनल I Business Ideas for Ladies in Marathi -Youtube Channel
जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर यूट्यूब चॅनल हा उत्तम मार्ग आहे.हा व्यवसाय तुम्हाला घरात बसून करता येईल.शिवाय कुठल्याही वेळेत व पार्ट टाईम किंवा फूल टाईम म्हणून करता येईल.
तुम्ही विविध रेसिपीज चे व्हिडिओ बनवून अपलोड करू शकता. तुम्हाला फॅशन,योगा,फिटनेस, गार्डनिंग यातील कोणत्याही विषयाबाबत माहिती असेल तर तो विषय निवडून तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. गुगल अड्सेन्स, स्पॉन्सर, अफिलिएट मार्केटिंग असे विविध पर्याय आहेत ज्यातून तुम्ही यूट्यूब वरून कमाई करू शकता.
7)ब्लॉगिंग I Business Ideas for Ladies in Marathi – Blogging
यूट्यूब सारखाच ब्लॉगिंग हा सुद्धा ऑनलाईन कमाई करण्याचा चांगला मार्ग आहे.तुम्हाला आवड असलेल्या किंवा चांगली माहिती असलेला विषय निवडून तुम्ही ब्लॉगिंग सुरु करू शकता.डोमेन व होस्टिंग विकत घेऊन तुम्ही कमी पैश्यात ब्लॉग सुरु करू शकता.किंवा ब्लॉगर या वेबसाईट वरून फ्री मध्ये सुद्धा ब्लॉग सुरू करता येतो.
8)ट्युशन | Business Ideas for Ladies in Marathi – Tuition
शैक्षणिक कौशल्य असलेल्या महिला आपल्या कौशल्याचा वापर करून वापर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात ट्युशन देऊन मदत करू शकतात.अंगणवाडी मुले, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, उच्च माध्यमिक विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना शिकवणी देऊ शकता.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ट्युशन घेऊ शकता.डान्स क्लासेस, पेंटिंग क्लासेस, ड्रॉइंग क्लासेस घेऊ शकता.अल्प किंवा कोणत्याही गुंतवणुकीशिवाय हा व्यवसाय सुरू केले जाऊ शकतो.चालवले जाऊ शकतो.
9)बेकरी l Business Ideas for Ladies in Marathi – Bakery
बेकरी उत्पादने देशाच्या सर्व भागात लोकप्रिय आहेत. भारतातील बेकरी आणि बेक केलेल्या वस्तूंच्या व्यवसायात गेल्या काही वर्षांमध्ये प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या मागणीमुळे मोठी वाढ झाली आहे.अनेक महिला उद्योजकांनी बेकरी व्यवसाय हा घरगुती व्यवसाय म्हणून सुरु केला आहे.बेकरी व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी कमी पैशाची गुंतवणूक आवश्यकता असते, ज्यामुळे ते गृहिणींसाठी ते उपयुक्त ठरते.
10)टिफीन सर्व्हिस I Business Ideas for Ladies in Marathi – Tiffin service
जर तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत असेल आणि तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर दोन्ही एकत्र करून एक छोटा टिफीन सर्व्हिस चा व्यवसाय सुरू करू शकता.
भारतातील फूड कॅटरिंग उद्योग वार्षिक सरासरी 25-30% ने वाढतो असे म्हटले जाते.शहरी भागातील लोकसंख्या अधिक तरुण आणि काम करणारी होत असल्याने टिफीन सर्व्हिस ची मागणी प्रचंड वाढली आहे.या व्यवसायाला सुरुवातीच्या गुंतवणुकीची जास्त गरज नसते.कमी गुंतवणुकीत सुरुवात करता येईल.
महिलांसाठी अजुन काही बिझनेस आयडिया | More Business Ideas for Ladies in Marathi
इव्हेंट प्लॅनिंग
फ्रीलान्सिंग
फॅशन डिझायनिंग
फोटोग्राफी
ट्रेडिंग
सोशल मीडिया मॅनेजर
फिटनेस ट्रेनर
ग्राफिक डिझायनिंग
योगा सेंटर
कॅफे शॉप
हाताने बनवलेल्या वस्तूंची विक्री
पेपर बॅग व्यवसाय
निष्कर्ष
जर तुम्हाला ‘महिलांसाठी बिझनेस आयडिया(Business Ideas for Ladies in Marathi 2022) ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.