चिवडा म्हणजे लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांचा आवडता.चिवडा हा दिवाळीमध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ.स्नॅक्ससाठी द्यायलाही चिवडा अगदी उपयुक्त ठरताे. परंतु चिवडा करताना बऱ्याचदा काहीतरी गडबड होऊन जाते.म्हणून आपला चिवडा खमंग व कुरकुरीत व्हावा, म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
साहित्य
अर्धा किलो जाड पोहे,
पाव किलो शेंगदाणे,
कृती
धने,जिरे,साखर व मीठ मिक्सर मधून दळून घ्यावे व नंतर त्यात हळद व तिखट मिसळावे.
कढीपत्ता धुऊन पुसून कोरडा करावा.
कढईत तेल चांगले कडकडीत तापल्यावर तारेची किंवा स्टीलची पोहे तळायची गाळणी कढईच्या तेलात बुडवावी.
गाळणी मूठभर पोहे टाकावेत व गाळणीतच चमच्याने हलवावेत.
पोहे चांगले फुलले की गाळणी तेलातून काढावी व हलवून तेल नितळवावे व फुललेले पोहे परातीत काढावेत.
पुन्हा गाळणी तेलात ठेऊन पोहे तळायला काढावेत.याप्रमाणे सर्व पोहे तळून घ्यावेत.
नंतर कढीपत्त्याची पाने तेलात टाकून कुरकुरीत झाली की पोह्यात टाकावीत.
कढईत तेल राहिले असेल तर गाळणी बाहेर काढून कढईतील तेलातच सर्व शेंगदाणे एकदम तळायला टाकावेत.
शेंगदाण्याच्या आतील पांढरा भाग किंचित गुलाबी दिसायला लागला की शेंगदाणे झारीने गाळणीत काढून घ्यावेत.
व तेल निथळले की पोह्यत टाकावेत.
तळलेले पोहे व शेंगदाण्यावर मीठ, धने,जिरे,साखर,हळद व तिखट यांचे मिश्रण टाकावे.
चमच्याने ढवळून चांगले मिसळावे,चिवडा थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावा.
टीप : पोहे तळताना गॅस मोठा ठेवावा.गॅस मंद ठेवल्यास पोहे तळताना तेल थंड होऊन पोहे जास्त तेल ओढून घेतील व चिवडा तेलकट होईल.चिवड्यात टाकायचे मीठ व साखर बारीक दळावे.नाहीतर मीठ तळाला राहील.