डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | Digital Marketing in Marathi
आपल्यापैकी बरेच जण आज रोजच्या जीवनात डिजिटल मीडिया चा वापर करतात.आपल्यापैकी बहूतेकांच्या घरात मोबाईल,कॉम्प्युटर,लॅपटॉप, स्मार्ट वॉच अशी अनेक डिजिटल उपकरणे उपलब्ध असतात. ‘सध्याचे युग हे डिजिटल युग आहे’ हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकले असेल.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे तसेच संगणक आणि स्मार्टफोनच्या मोठ्या प्रमाणावर वापरामुळे विविध व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी नवीन मार्केटिंग युक्त्या वापरण्यास सुरुवात केली.त्यातूनच डिजिटल मार्केटिंगचा जन्म झाला.अनेक व्यवसाय पारंपरिक मार्केटिंग मधून डिजिटल मार्केटिंग कडे वळत आहेत.
चला तर मग जाणून घेऊया डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?(Digital Marketing in Marathi), डिजिटल मार्केटिंग चे प्रकार कोणते आहेत?,फायदे काय आहेत?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय उत्पादन किंवा सेवेची मार्केटिंग(जाहिरात) करणे होय.
सोप्या भाषेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून केली गेलेली मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. डिजिटल मार्केटिंग ला इंटरनेट मार्केटिंग किंवा ऑनलाईन मार्केटिंग असेही म्हटले जाते.
पारंपरिक मार्केटिंग मध्ये ऑफलाईन पद्धतीने मार्केटिंग केली जाते तर डिजिटल मार्केटिंग मध्ये ऑनलाईन साधनांचा वापर करून.डिजिटल मार्केटिंग मध्ये ब्लॉग पोस्ट, ईमेल,सोशल मीडिया यांचा वापर केला जाऊ शकतो.आपल्या वस्तू व सेवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच ब्रँड अवेरनेस साठी डिजिटल मार्केटिंग चा वापर केला जातो.डिजिटल मार्केटिंगबद्दल संपूर्ण पुस्तके,कोर्सेस तयार होत आहेत.हे एक वाढत जाणारे व सतत विकसित होणारे क्षेत्र आहे.
डिजिटल मार्केटिंग चे प्रकार | Types of Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग चे काही प्रकार पुढीप्रमाणे आहेत.
1. सर्च इंजिन ऑपटीमायझेशन (SEO)
सर्च इंजिन जसे की गूगल यामध्ये आपल्या वेबसाईट ल उच्च रँक करण्यासाठी ओपटीमाइज करण्याची ही प्रक्रिया आहे.SEO ही वेबसाइट Google वर उच्च रँकमध्ये मदत करण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया आहे. यामुळे आपली वेबसाईट ही सर्च मध्ये लवकर दिसते.SEO चे मुख्य तीन प्रकार आहेत.1) ऑन पेज एसइओ 2) ऑफ पेज एस इओ 3) टेक्निकल एस इओ
2.कंटेंट मार्केटिंग
आपण तयार केलेल्या कंटेंट ची मार्केटिंग यामध्ये केली जाते.आपल्या ब्रँड बद्दल माहिती देण्यासाठी,वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी,ग्राहक मिळवण्यासाठी कंटेंट मार्केटिंग केली जाते.ब्लॉग पोस्ट, इबुक यातून कंटेंट मार्केटिंग करू शकतो.कंटेंट मार्केटिंग मध्ये आपण आपल्या ग्राहकांना चांगले कंटेंट उपलब्ध करून त्यांच्यासोबत मजबूत संबंध निर्माण करू शकतो.
3. सोशल मीडिया मार्केटिंग
सोशल मीडिया सध्या किती प्रसिद्ध आहे हे आपल्याला सांगायला नको.आजकाल अनेक ब्रँड्स सोशल मीडिया वर आपल्या प्रॉडक्ट चे प्रमोशन करत असतात.ब्रँड जागरूकता वाढवण्यासाठी, ट्रॅफिक वाढवण्यासाठी आणि व्यवसायासाठी लीड निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो.फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅप चाट, अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर मार्केटिंग केली जाते.
4. पे पर क्लिक (PPC)
पे पर क्लिक ही प्रकाशकाला पैसे देऊन तुमच्या वेबसाइटवर ट्रॅफिक आणण्याची एक पद्धत आहे.या जाहिरात दिली जाते.जेव्हा तुम्ही दिलेल्या जाहिरातीवर क्लिक झाल्यास प्रकाशकाला पैसे द्यायला लागतात. पीपीसी च उदाहरण म्हणजे गुगल अड्स. फेसबुक,इंस्टाग्राम यावर सुद्धा अॅड देऊन मार्केटिंग केली जाते.
5. ईमेल मार्केटिंग
कंपन्या त्यांच्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याचासाठी ईमेल मार्केटिंग चा वापर करतात.ईमेलचा वापर कंटेंट प्रॉमोट करण्यासाठी,डिस्काउंट किंवा इव्हेंट बद्दल आपल्या ग्राहकांना माहिती देण्यासाठी, वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी केला जातो.शिवाय ब्लॉग ल सबस्क्राईब करण्यासाठीही ईमेल मार्केटिंग केली जाते.
6. सर्च इंजिन मार्केटिंग (SEM)
सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे सर्च इंजिन (जसे की गूगल, बिंग) च्या रिझल्ट पृष्ठांवर दिसणार्या सशुल्क जाहिराती वापरून व्यवसायाची मार्केटिंग करणे.
मार्केटिंग साठी जाहिरातदार अशा कीवर्डवर सशुल्क जाहिरात लावतात, जे गूगल आणि Bing सारख्या सर्च इंजिन चे वापरकर्ते विशिष्ट उत्पादने किंवा सेवा शोधत असताना सर्च करू शकतात. जाहिराती त्या सर्च क्वेरींच्या परिणामांसोबत वापरकर्त्यांना दिसतात.
सर्च इंजिन मार्केटिंगचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यातून जाहिरातदारांना आपल्या जाहिराती या अशा ग्राहकांसमोर दाखवण्याची संधी मिळते जे ती विशिष्ट वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यास तयार असतात.
इतर कोणतेही जाहिरातिचे माध्यम हे करू शकत नाही. म्हणूनच सर्च इंजिन मार्केटिंग हे एक प्रभावी साधन आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
7. अफिलियेट मार्केटिंग
अफिलियेट मार्केटिंग मधून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला प्रॉडक्टची रेफरल लिंक शेअर करावी लागते. त्या लिंक वरून एखादया व्यक्तीने वस्तू खरेदी केली तर तुम्हाला त्या वस्तू मागे कमीशन मिळते.
तुमच्या वेबसाइटवर, यूट्यूब चॅनल किंवा सोशल मीडिया अकाउंट वर इतर कोणाच्या तरी उत्पादनांचा किंवा सेवांचा प्रचार करण्यासाठी कमिशन मिळते.अमेझॉन,फ्लिपकार्ट या सारख्या कंपन्याचे अफिलिएट प्रोग्रॅम आहेत.जे त्यांची उत्पादने विकणाऱ्या वेबसाइट्सना दरमहा लाखो रुपये कमिशन देतात.
डिजिटल मार्केटिंग चे फायदे | Benefits of Digital Marketing in Marathi
1)जागतिक पोच निर्माण करता येते.
2)कमी पैशात डिजिटल मार्केटिंग करता येते.
3)शिकण्यास सोपी आहे.
4)विविध प्रकारची धोरणे (स्त्रेटरजी) वापरता येते.
5) ग्राहकां सोबत इंगेजमेंट वाढते.
6)योग्य ग्राहकांना लक्ष करता येते.
7)ब्रँड बद्दल विश्वासार्हता निर्माण होते.
डिजिटल मार्केटिंग कशी शिकावी? | How to learn Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग कोर्सेस | Digital Marketing Courses in Marathi
तुम्ही पेड(सशुल्क) डिजिटल मार्केटिंगचे कोर्स विकत घेऊन डिजिटल मार्केटिंग शिकू शकता.आज, इंटरनेटवर वर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग शिकवणारे भरपूर कोर्स मिळतील.तसेच ऑफलाइन डिजिटल मार्केटिंग शिकवणारे देखील कोर्स तुम्ही शिकू शकता.काही फ्री कोर्स ही उपलब्ध असतात जे तुम्हाला शिकता येतील.
यूट्यूब | Digital Marketing Courses Youtube Marathi
यूट्यूब हा डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा एक चांगला मार्ग आहे. यूट्यूब वर, तुम्हाला अनेक चॅनेल सापडतील जे डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती देतात.काही वेळेस तुम्हाला पेड कोर्स पेक्षाही चांगल्या गुणवत्तेचे डिजिटल मार्केटिंग बद्दलचे व्हिडिओ यूट्यूब वर मिळतील.
डिजिटल मार्केटिंग बुक्स | Digital Marketing Books in Marathi
जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्सवर पैसे खर्च करायचे नसतील,आणि तुम्हाला बुक्स वाचायला आवडत असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगची पुस्तकेही स्वस्त दरात खरेदी करून वाचू शकता.इंटरनेट ई बुक्स डाऊनलोड करून वाचू शकता.
पुस्तके तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल जास्त प्रॅक्टिकल ज्ञान देऊ शकत नाहीत,परंतु डिजिटल मार्केटिंग सुरू करण्यासाठी पुस्तके हे एक चांगले साधन आहे.
डिजिटल मार्केटिंग ब्लॉग्स | Digital Marketing Blogs in Marathi
डिजिटल मार्केटिंग फ्री मध्ये शिकण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ब्लॉग.ब्लॉग मूळे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकण्यात मदत होईल.डिजिटल मार्केटिंगच्या नवनवीन घडामोडींबद्दल तुम्हाला माहिती मिळेल.
डिजिटल मार्केटिंग मध्ये करियर | Careers in Digital Marketing in Marathi
चांगल्या व कुशल डिजिटल मार्केटर्सच्या मागणीत सतत वाढ होत आहे. या क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या व्यक्तींना भरपूर संधी उपलब्ध आहेत.व भविष्यात या संधी वाढतील अशी अपेक्षा आहे.
टॉप डिजिटल मार्केटिंग जॉब्स
- डिजिटल मार्केटिंग मॅनेजर
- कंटेंट मार्केटर
- पीपीसी (PPC) एक्स्पर्ट
- सोशल मीडिया मॅनेजर
- वेब डेवलोपर
- वेब डिझाईनर
- एसइओ (SEO) मॅनेजर
FAQ – Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय उत्पादन किंवा सेवेची मार्केटिंग(जाहिरात) करणे होय.
डिजिटल मार्केटिंग चे प्रकार | Types of Digital Marketing in Marathi
सर्च इंजिन ऑपटीमायझेशन (SEO),कंटेंट मार्केटिंग,सोशल मीडिया मार्केटिंग,पे पर क्लिक (PPC),ईमेल मार्केटिंग,सर्च इंजिन मार्केटिंग (SEM),अफिलियेट मार्केटिंग
डिजिटल मार्केटिंग जॉब्स
डिजिटल मार्केटिंग मॅनेजर
कंटेंट मार्केटर
पीपीसी (PPC) एक्स्पर्ट
सोशल मीडिया मॅनेजर
वेब डेवलोपर
वेब डिझाईनर
एसइओ (SEO) मॅनेजर
डिजिटल मार्केटिंग कशी शिकावी? | How to learn Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग कोर्सेस,यूट्यूब चॅनल,ब्लॉग्स,बुक्स अशा विविध मार्गाने तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकू शकता.
निष्कर्ष
आजकाल यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी डिजिटल मार्केटिंग आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग तुमचा व्यवसाय वाढवू शकतात.शिवाय या क्षेत्रात करिअर च्या संधीही अनेक आहेत.
जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?(Digital Marketing in Marathi) ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन