डिवीडंड म्हणजे काय? । Dividend meaning in Marathi
जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही डिवीडंड हा शब्द नक्की ऐकला असेल.आज मी तुम्हाला शेअर मार्केट मधील डिवीडंड म्हणजे नक्की काय असतो त्याबद्दल माहिती सांगणार आहे.
डिवीडंड म्हणजे काय? । Dividend meaning in Marathi
डिवीडंड चा अर्थ आहे लाभांश.लाभांश हा एक प्रकारचा बोनस आहे जो कंपनी शेअर धारकांना देते.डिवीडंड हा कॅश किंवा बोनस च्या स्वरूपात दिला जाऊ शकतो.जेव्हा कंपनीला नफा होतो तेव्हा कंपनी तो नफा आपल्या शेअर धारकांसोबत डिवीडंड चा स्वरूपात वाटते.डिवीडंड देणे किंवा न देणे आणि दिला तर किती देणे हे पूर्णपणे कंपनीच्या हातात असते.काही कंपन्या डिवीडंड न देता तोच पैसा कंपनीत गुंतवतात.
डिवीडंड यिल्ड म्हणजे काय? | Dividend Yeild in Marathi
डिव्हिडंड यिल्ड हे कंपनीच्या प्रति शेअर दिलेल्या लाभांशाचे व कंपनीच्या सध्याच्या शेअर प्राइस चे गुणोत्तर आहे.
डिवीडंड यिल्ड = (प्रति शेअर डिवीडंड / शेअरची मार्केट प्राईस ) ×100
Dividend Yield= (Cash Dividend per share/ Market price of share) ×100
डिवीडंड कसा दिला जातो? | How Dividend is given in Marathi
डिवीडंड हा प्रती शेअर च्या आधारावर दिला जातो.समजा Abc कंपनीने 5 रुपये प्रति शेअर डिवीडंड ची घोषणा केली आणि तुमच्याकडे त्या कंपनीचे 100 शेअर असले तर तुम्हाला 5×100 म्हणजे 500 रुपये डिवीडंड मिळेल.तुमच्याकडे जेवढे जास्त शेअर असतील तेवढा जास्त डिवीडंड तुम्हाला मिळेल.मिळालेला डिवीडंड हा तुमच्या बँक खात्यात जमा होतो
डिवीडंड चे प्रकार | Types of Dividend in Marathi
कॅश डिवीडंड
कॅश डिवीडंड हा सर्वात जास्त दिला जाणारा डिवीडंड चा प्रकार आहे.बहुतांश कंपन्या या कॅश डिवीडंड च्या स्वरूपातच डिवीडंड देतात.या मध्ये पैश्याच्या स्वरूपात डिवीडंड दिला जातो.हा डिवीडंड शेअर धारकांना त्यांच्या बँक खात्यात दिला जातो.
शेअर डिवीडंड
कंपनी शेअर चा स्वरूपात सुद्धा डिवीडंड देतात.शेअर डिवीडंड मध्ये कंपन्या शेअर धारकांना शेअर च्या स्वरूपात डिवीडंड देतात.
स्क्रीप डिवीडंड
जेव्हा कंपनीकडे डिवीडंड देण्यास पुरेसे पैसे नसतात पण कंपनीला आपल्या शेअर धारकांना डिवीडंड द्यायचा असतो तेव्हा कंपनी स्क्रिप डिवीडंड देते.म्हणजेच कंपनी भविष्यात डिवीडंड देण्याचा वादा करते
महत्त्वाच्या तारखा | Important Dates for Dividend in Marathi
डिक्लेरेशन डेट
कंपनी ज्या दिवशी डिवीडंड देण्याची घोषणा करते त्या तारखेला डिक्लेरेशन डेट असे म्हणतात.कंपनी किती व कोणत्या तारखेला डिवीडंड देईल याचीही घोषणा केली जाते.या तारखेला अनाउन्स मेंट डेट असेही म्हणतात.
एक्स-डिविडंड डेट
जर तुम्हाला डिवीडंड मिळवायचा असेल तर एक्स डिवीडंड डेट च्या आधी तुमच्याकडे शेअर असणे आवश्यक आहे.जर तुम्ही एक्स डिवीडंड डेट ला किंवा त्यानंतर शेअर खरेदी केले असतील तर तुम्हाला डिवीडंड मिळणार नाही.
रेकॉर्ड डेट
प्रत्येक कंपनीच्या शेअर धारकांची एक रेकॉर्ड बुक असते.ज्यामध्ये शेअर धारकांची नावे असतात.रेकॉर्ड डेट च्या दिवशी ज्या शेअर धारकांचे नाव रेकॉर्ड बुक मध्ये असते ते डिवीडंड मिळण्यास पात्र असतात.रेकॉर्ड डेट ची माहिती डेक्लारेशन डेट लाच दिली जाते.
डिवीडंड का दिला जातो? | Why are Dividends paid in Marathi
अनेक वर्षांपासून चांगली कमाई होत असलेल्या कंपन्यांद्वारे गुंतवणूकदारांना लाभांश दिला जातो. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी तसेच कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढवण्याच्या हेतूने लाभांश दिला जाऊ शकतो.
नियमित लाभांश मिळाल्याने गुंतवणूकदारांचा कंपनी बद्दल आत्मविश्वास अनेकदा वाढतो. हे त्यांना कंपनीच्या भविष्यातील संभावनांबद्दल माहिती देते. शेअर मार्केट मधून नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी गुंतवणूकदार अनेकदा लाभांश देणाऱ्या कंपन्यांची निवड करतात. त्यामुळे कंपनीच्या शेअर ची मागणी वाढू शकते.मागणी वाढल्यामुळे मग शेअरची किंमतही वाढते.
डिवीडंड वर कर | Tax on Dividend in Marathi
डिवीडंड म्हणजे लाभांश हे उत्पन्न म्हणून करपात्र आहेत.लाभांश हा शेअर धारकाला लागू आयकर स्लॅब दरानुसार करपात्र आहे. तसेच, लाभांश 5,000 रूपयांपेक्षा जास्त असल्यास ते 10% च्या TDS च्या अधीन आहे.
कोरोना महामारीमूळे हा दर 10% वरून 7.5% पर्यंत कमी करण्यात आला होता.हा नवीन दर फक्त मार्च 2021 पर्यंत लागू होता.
डिवीडंड पेआउट रेशो म्हणजे काय? | Dividend Payout Ratio in Marathi
शेअर धारकांना लाभांश(डिवीडंड) म्हणून वितरित केलेल्या निव्वळ उत्पन्नाची टक्केवारी यालाच डिवीडंड पेआउट रेशो म्हणतात.
निष्कर्ष
शेअर मार्केट मधून नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी डिवीडंड हा चांगला मार्ग असू शकतो.पण त्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये चांगले डिवीडंड देणारे शेअर असणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला डिवीडंड म्हणजे काय? । Dividend meaning in Marathi ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.