ऑनलाईन पैसे कमावण्याचे 25+ मार्ग | How to Earn Money Online Marathi
मित्रानो जगात इंटरनेट चा वापर खूप वाढला आहे.आपल्या जीवनातील कामे आपण इंटरनेट क्या मदतीने झटपट करू शकतो जसे की पैसे पाठवणे,काढणे,ऑनलाईन शॉपिंग करणे.
लोक इंटरनेट चा फायदा घेत ज्ञान मिळवत आहेत.तसेच घरबसल्या पैसेही कमवत आहेत.जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल.कामामध्ये नियमितता ठेवावी लागेल.
तुम्ही संपूर्ण जगात कुठूनही तुम्ही ऑनलाईन पैसे कमावू शकता.ऑनलाईन पैसे कमावण्याची लिमिट नाही आहे.तुम्ही महिन्याला लाखो रुपये सुद्धा कमावू शकता.
मित्रानो हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.तुम्हाला मी यात 25 पेक्षा जास्त मार्ग सांगणार आहे ज्यातून तुम्ही ऑनलाईन पैसे कमावू शकता.(How to Earn Money Online Marathi)
1.यूट्यूब चॅनल| How to Earn Money Online from Youtube in Marathi
आजच्या काळात खूप कमी लोक असतील ज्यांना यूट्यूब बद्दल माहीत नसेल.यूट्यूब हा पैसे कमावण्याचा एक उत्तम मार्ग आहे.लोक त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करून यूट्यूब चॅनलवर त्यांचे व्हिडीओ अपलोड करतात आणि ते चांगले पैसे देखील कमावतात.
यूट्यूब वर तुम्ही फ्री मध्ये आपला चॅनल सुरू करू शकता.तुम्हाला कुठलीही गुंतवणूक करण्याची गरज लागत नाही.त्यासाठी तुम्हाला फक्त एक Gmail अकाउंटची गरज आहे.त्यानंतर तुम्ही स्वतःचा चॅनल बनवून व्हिडिओज अपलोड करू शकता.
तुमच्या यूट्यूब चॅनल वर 1000 subscribers व 4000 तासाचा वॉच टाईम पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचा चॅनल मोनेटाइज करू शकता. त्यानंतर तुमच्या चॅनल वर ads दिसू लागतील व त्याने तुमची कमाई होईल.याशिवाय तुम्ही स्पॉन्ससर्स द्वारे सुद्धा पैसे कमावू शकता.
2.शेअर मार्केट| How to Earn Money online from Share Market in Marathi
शेअर मार्केट हा सुद्धा पैसे कमावण्याचा एक उत्तम मार्ग आहे.शेअर मार्केट मध्ये पैसे लावण्यासाठी तुम्हाला डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट ची आवश्यकता असते.जे तुम्ही घरबसल्या मोबाईल द्वारे उघडू शकता.Upstox,Zerodha,Groww या अँपस द्वारे तुम्ही अकाउंट उघडू शकता.
शेअर मार्केट मध्ये अर्धवट माहिती घेऊन पैसे गुंतऊ नका कारण यातूनच तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.शेअर मार्केट मध्ये पैसे लावण्याआधी संपूर्ण ज्ञान घ्या आणि मगच पैसे लावा.
3.ब्लॉगिंग| How to Earn Money online from Blogging in Marathi
तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयावर तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरु करू शकता. किंवा वेगवेगळ्या विषयावर सुद्धा तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता.तुम्ही blogger वर अगदी फ्री मध्ये सुद्धा ब्लॉग सुरू करू शकता.
WordPress.org या वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता.पण त्यासाठी तुम्हाला डोमेन व hosting विकत घ्यावी लागते.WordPress वर तुम्हाला blogger पेक्षा अधिक फिचर्स मिळतात.
ब्लॉगिंग द्वारे तुम्ही Google AdSense , Affiliate Marketing, Sponsors यातून पैसे कमावू शकता.ब्लॉगिंग करुन पैसे कमवण्यासाठी तुम्ही पोस्ट केलेले कन्टेन्ट हे युनिक असावे.
या साठी तुम्हाला मेहनत करावी लागेल.
4.सेल फोटोज्| How to Earn Money online from Selling Photos in Marathi
तुम्ही स्वतः काढलेले फोटोज् तुम्ही Shutterstock,Adobe Stock,Alamy,iStock, Getty Images या सारख्या वेबसाईट वर अपलोड करून पैसे कमावू शकता.जेव्हा एखादी व्यक्ती तुम्ही अपलोड केलेला फोटो विकत घेते तेव्हा तुम्हाला त्याचे कमिशन मिळते.
अशा प्रकारे तुम्ही फोटोज् अपलोड करून पैसे कमावू शकता.
5.फ्रीलन्सिंग| How to Earn Money Online from Freelancing in Marathi
Freelancing म्हणजे स्वतंत्रपणे काम करणे.या मध्ये तुम्ही क्लाएंट चे काम करून देता आणि त्याबदल्यात तुम्हाला क्लाएंट पैसे देतो.आपल्या घरात बसून आपल्याला हव्या त्या वेळेत आणि हव्या त्या पद्धतीने काम करून पैसे कमविण्यासाठी फ्रीलान्सिंग हा एक चांगला मार्ग आहे.
Fiverr,Upwork,Freelancer ya websites वरुन तुम्ही freelancing चे काम सुरू करू शकता.
फ्रीलान्सिंग वेबसाईटवर तुम्हाला आपला प्रोफाईल तयार करावा लागेल.त्यानंतर तुम्हाला येत असलेली सर्व्हिस तुम्ही निवडू शकता.Graphics Design,Writing Translation,Web design अशी विविध कामे तुम्ही निवडू शकता.तुमचा प्रोफाइल जेवढा चांगला असेल तेवढे जास्त लोक तुम्हाला काम देण्याची शक्यता असते.
Freelancing साठी तुमच्याकडे कौशल्य असणे आवश्यक आहे.खुप सारे असे लोक आहेत जे आपल्या कौशल्या द्वारे इथून चांगली कमाई करतात. Freelancing तुम्ही Full Time किंवा Part Time म्हणून करु शकता.
6.ऍप बनवून पैसे कमवा| How to Earn Money Online from App in Marathi
जर तुम्हाला कोडिंग चे ज्ञान असेल तर तुम्ही ऍप बनवून पैसे कमावू शकता.तुमचा ऍप बनवून झाल्यावर तो Google play store la published करायचा.Google admob द्वारे तुमच्या ऍप वर ads दिसू लागतील. त्यातून तुम्हाला पैसे मिळतील.
तसेच तुमच्या ऍप वर पेड वर्जन देऊन सुद्धा तुम्ही पैसे कमावू शकता.
काही असे ऍप सुद्धा आहेत ज्यामध्ये तुम्ही गेम्स खेळून किंवा टास्क पूर्ण करून पैसे कमावू शकता.
7. अफिलिएट मार्केटिंग| How to Earn Money Online from Affiliate Marketing in Marathi
अफीलिएट मार्केटिंग द्वारे देखील अनेक लोक महिन्याला लाखो रुपये कमावतात.
Affiliate Marketing मधून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला प्रॉडक्टची रेफरल लिंक शेअर करावी लागते. त्या लिंक वरून एखादया व्यक्तीने वस्तू खरेदी केली तर तुम्हाला त्या वस्तू मागे कमीशन मिळते.
Affiliate Marketing मधून पैसे कमावण्यासाठी तुम्ही Flipkart किंवा Amazon च्या Affiliate Program मध्ये तुमचे अकाउंट तयार करू शकता.
त्यानंतर एखाद्या प्रॉडक्ट ची रेफरल लिंक तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल वर किंवा वेबसाईट वर शेअर करू शकता. त्यामधून तुम्हाला कमाई करता येईल.
तसेच तुम्ही affiliate marketing साठी स्पेशल यूट्यूब चॅनल किंवा वेबसाईट सुरू करू शकता.
8.सोशल मीडिया पेज| How to Earn Money Online from Social Media in Marathi
फेसबुक किंवा इंस्टाग्राम या सोशल मीडिया ऍप वर तुम्ही स्वतःचा सोशल मीडिया पेज सुरू करू शकता.
इंस्टाग्राम हा एक लोकप्रिय ऍप आहे.इथे तुम्ही पेज क्रिएट करून तुम्हाला माहिती असलेल्या विषयाबद्दल फोटोज् व व्हिडिओज शेअर करू शकता.तसेच reels बनवून सुद्धा पैसे कमावू शकता.
sponsorship किंवा प्रमोशन या मधून तुम्ही कमाई करू शकता.तसेच affiliate marketing सुद्धा करता येते.आपले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस सुद्धा सेल करून पैसे कमावू शकता.
9.कंटेंट राईटर| How to Earn Money Online from Content Writing in Marathi
कंटेंट रायटींग हा सुद्धा पैसे कमावण्याचा चांगला मार्ग आहे.तुम्ही ब्लॉग साठी कंटेंट रायटींग करू शकता.किंवा यूट्यूब व्हिडिओज क्या स्क्रिप्ट साठी कंटेंट रायटींग करू शकता.यातून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.चांगल्या कंटेंट रायटींग साठी तुमचे ग्रामर व स्टाईल ही चांगली असली पाहिजे.
विविध कंपन्या आवश्यतकतेनुसार कन्टेन्ट रायटिंगची कामं देतात.
10.सेल कोर्सेस ऑनलाईन| How to Earn Money Online from Selling Courses in Marathi
ऑनलाईन लर्निग चे मार्केट खूप मोठे आहे.तुम्ही घरबसल्या ऑनलाईन कोर्स तयार करून तो विकू शकता. तुम्हाला एखाद्या गोष्टी बद्दल चांगले ज्ञान असेल तर तुम्ही स्वतःचा कोर्स बनवून तो ऑनलाईन विकू शकता.
Udemy ही एक अशी वेबसाईट आहे जिथे तुम्ही ऑनलाईन कोर्स विकू शकता.
अन्य काही ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग
यू आर एल शोर्टनर
डोमेन सेलिंग
डाटा एंट्री
ऑनलाईन ट्युशन
कंटेंट रायटींग
क्रिप्टोकरंसी खरेदी व विक्री
ड्रोपशिपिंग
ऑनलाईन टीशर्ट विक्री
ऑनलाईन सर्वे
वर्चुअल असिस्टंट
ऑनलाईन नोट्स विका
वेबसाईट खरेदी व विक्री
पॉडकास्ट
रेफर अँड अर्न
इंस्टाग्राम पेज
इ बुक पब्लीश करा
वेब डेवलपर
निष्कर्ष
इथे मी तुम्हाला जे 25+ मार्ग सांगितले आहे त्यामधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला वेळ देणे देखील महत्त्वाचे आहे.
जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?(How to Earn Money Online Marathi) ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.