चांगला म्युच्युअल फंड कसा निवडायचा? | How to Select a Mutual Fund in Marathi
म्युच्युअल फंड ही एक गुंतवणूक योजना आहे.ज्यामध्ये म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूक करून पैसे कमवण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांचे फंड एकत्र करते.एकत्र केलेले पैसे फंड मॅनेजर स्टॉक, सोने, रोखे यासह विविध सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी गुंतवतो.
म्युच्युअल फंड हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. हे सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या गरजांनुसार गुंतवणूक उपाय देऊ शकते.
आजच्या घडीला बरेच म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत.त्यामुळे चांगला म्युच्युअल फंड कसा निवडायचा?(How to Select a Mutual Fund in Marathi) हा प्रश्न आपल्याला पडतो.
चांगला म्युच्युअल फंड कसा निवडायचा? | How to Select a Mutual Fund in Marathi
तुमचे लक्ष्य ठरवा
म्युच्युअल फंड निवडण्यापूर्वी, पहिली पायरी म्हणजे तुम्हाला ध्येय निश्चित करावे लागेल. म्हणजेच, तुम्हाला किती काळ गुंतवणूक करायची आहे, तुम्ही किती पैसे गुंतवणार आहात, रिटर्न्स ची अपेक्षा, कारण हे सर्व तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करणारा फंड निवडण्यात मदत करतील.
चांगला म्युच्युअल फंड निवडण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गरजेनुसार म्युच्युअल फंड निवडण्यावर लक्ष केंद्रित करणे.
स्पष्ट उद्दिष्टे असणे गुंतवणूक आणि परिणाम ट्रॅकिंग सुलभ करते. तुमचे उद्दिष्ट परदेशात जाणे, निवृत्तीसाठी बचत करणे किंवा घर खरेदी करणे, किंवा अन्य काही असेल, तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला किती रक्कम लागेल याचा अंदाज घ्या आणि त्यानुसार गुंतवणूक सुरू करा.
जोखीम विश्लेषण करा
तुमच्या जोखमीच्या क्षमतेचे मूल्यांकन करा. विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांमध्ये येणाऱ्या जोखमीकडे लक्ष द्या.
उदाहरणार्थ, इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये इतर फंडांच्या तुलनेत उच्च पातळीची जोखीम असते. आणि यामुळे पोर्टफोलिओमध्ये काही अस्थिरता येऊ शकते.
परंतु इक्विटी म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा हा इतर फंडांच्या तुलनेत जास्त असतो. हा फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे जे जास्त परतावा मिळविण्यासाठी जास्त जोखीम घेण्यास इच्छुक आहेत.
जर तुम्हाला जास्त जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही इतर फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडू शकता. जसे डेट म्युच्युअल फंड. हे फंड कमी जोखमीसह येतात. परंतु इक्विटी म्युच्युअल फंडांच्या तुलनेत परतावा देखील कमी आहे.
म्हणून आपले लक्ष्य ठरवल्यानंतर आपण किती जोखीम घेण्यास सक्षम आहोत हेही बघितले पाहिजे.
एक्सपेंस रेशो तपासा
गुंतवणूक करण्यापूर्वी, गुंतवणुकीशी संबंधित विविध प्रकारचे शुल्क समजून घेणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीकडून आकारले जाणारे कमिशन किंवा शुल्क म्हणजे एक्स्पेंस रेशी असतो. गुंतवणूकदाराने कमी एक्सपेंस रेशो असलेले म्युच्युअल फंड शोधणे महत्त्वाचे आहे.
कारण कालांतराने त्याचा तुमच्या गुंतवणुकीवर लक्षणीय परिणाम होईल. सामान्यतः असे म्हटले जाते की AUM जास्त असेल तर एक्सपेंस रेशो कमी असेल.
बहुतेक फंडांचे एक्सपेंस रेशो साधारणतः १-२% असतात.तर त्यातील काहींचे १% पेक्षा कमी असतात.एक्सपेंस रेशो तपासणे महत्त्वाचे आहे. कारण किरकोळ फरक देखील तुमच्या गुंतवणुकीच्या वाढीवर लक्षणीय परिणाम करू शकतो.
म्युच्युअल फंडाचा परफॉर्मन्स चेक करा
तुम्ही ज्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार आहात त्या फंडाने भूतकाळात कसा रिटर्न दिला आहे याचे मूल्यांकन करा.माझ्या मते एखाद्या नवीन फंडात गुंतवणुक टाळा.
तसेच मिळालेल्या रिटर्न मध्ये सातत्य देखील महत्त्वाचे आहे. समजा एखाद्या फंडाने गेल्या तीन वर्षांत 9%, 8% आणि 10% रिटर्न दिला आहे. आणि दुसर्या फंडाने 3 वर्षांत 8%, 2% आणि 19% रिटर्न दिला आहे.तर तुम्ही पहिल्या फंडासारखा नियमित चांगला रिटर्न देणारा फंड निवड करण्यास अधिक प्राधान्य देऊ शकता.
म्युच्युअल फंडांची निवड केवळ त्यांच्या 5-6 महिने कालावधीतील कामगिरीच्या आधारावर करू नये.तर 3-4 वर्षांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारे आणि स्थिर रिटर्न देणारे फंड निवडा.
एका म्युच्युअल फंड योजनेची दुसर्याशी तुलना करताना, गुंतवणूकदारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की ते एका समान प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनेची तुलना करत आहेत. उदाहरणार्थ, लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंडाची तुलना इतर तत्सम लार्जं कॅप म्युच्युअल फंडाशीच केली पाहिजे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कोणत्याही म्युच्युअल फंडाची भूतकाळातील कामगिरी ही त्याच्या भविष्यातील कामगिरीची हमी नसते. पण भूतकाळातील कामगिरीवरून तुम्हाला भविष्यात कोणत्या प्रकारचा रिटर्न मिळेल याची कल्पना कदाचित येऊ शकते.
टॅक्स ची माहिती घ्या
गुंतवणूकदारांनी टॅक्स कडे दुर्लक्ष करू नये.कारण त्याचा तुमच्या नफ्यावर फरक पडतो.
इक्विटी म्युच्युअल फंडातील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजेच १२ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी पैसे गुंतवून ठेवल्यास १५% कर लागतो. आणि लाँग टर्म कॅपिटल गेन (12 महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवल्यास) 1 लाख रुपयांपर्यंत टॅक्स मध्ये सूट मिळते आणि त्यानंतर 10% टॅक्स लागतो.
तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड जितके जास्त काळ ठेवता तितके अधिक टॅक्स कमी होतील.लाँग टर्म कॅपिटल गेन वर लागणारा टॅक्स हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन च्या तुलनेने कमी आहे.
फंड मॅनेजर ची माहिती घ्या
तुमच्या म्युच्युअल फंडाचा फंड मॅनेजर कोण आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. तुमचा म्युच्युअल फंड कसा काम करत आहे यावर फंड मॅनेजरची महत्त्वाची भूमिका असते. कारण कोणत्या स्टॉक्स किंवा सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करायची आणि कोणत्याही म्युच्युअल फंडासाठी पैसे कसे वितरित करायचे हे फंड मॅनेजर ठरवतो.
निष्कर्ष – चांगला म्युच्युअल फंड कसा निवडायचा? | How to Select a Mutual Fund in Marathi
मित्रानो वरील दिलेल्या टिप्स च्या मदतीने तुम्हाला चांगला म्युच्युअल फंड निवडण्यास मदत होईल.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही एफडी, सोने यांसारख्या इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा चांगली मानली जाते. परंतु, कोणत्याही गुंतवणूकदाराने त्यांच्याशी संबंधित बाजारातील जोखीम काळजीपूर्वक समजून घेणे फार महत्वाचे आहे. तसेच, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी, तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची माहिती घ्या आणि स्वतःहून शक्य तितके संशोधन करा.
मित्रांनो जर तुम्हाला चांगला म्युच्युअल फंड कसा निवडायचा?(How to Select a Mutual Fund in Marathi) याबाबत ची माहिती आवडली असेल तर सोशल मीडिया मध्ये जरूर शेअर करा.
तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये विचारा.
- हे सुद्धा वाचा