नमस्कार. MarathiWay या वेबसाईट वर तुमचा स्वागत आहे.आज मी तुम्हाला पीई रेशो म्हणजे काय?( p/e ratio in Marathi) याबद्दल माहिती सांगणार आहे.जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल किंवा शेअर मार्केट बद्दल माहिती घेत असाल तर तुम्ही पीई रेशो हा शब्द नक्कीच ऐकला असेल.चला तर मग जाणून घेऊया पीई रेशो म्हणजे काय.
पीई रेशो म्हणजे काय? | P/E Ratio in Marathi
कोणत्याही कंपनीच्या शेअर ची किंमत ही स्वस्त आहे की महाग की माहीत करण्यासाठी पीई रेशो चा वापर केला जातो. P/E ratio चा अर्थ आहे Price to Earning ratio. P/E रेशो हा कंपनीच्या शेअर ची सद्ध्याची किंमत व कंपनीची प्रती शेअर अर्निग यांचा भागाकार करून काढला जातो.
pe रेशो सांगतो की गुंतवणूकदार त्या कंपनीच्या शेअर मध्ये किती रुपये लावायला तयार आहे जेणेकरून त्याला १₹ नफा होईल.समजा AB कंपनीचा pe रेशो २० आहे तर याचा अर्थ असा की गुंतवणूकदार २० ₹ लावायला तयार आहे जेणेकरून त्याला १₹ नफा होईल.
P/E ratio चा फॉरम्यूला
P/E रेशो काढण्यासाठी शेअर क्या सद्ध्यच्या किंमतीला प्रती शेअर कमाईने ने भागले जाते.
P/E ratio =Current Price of Share÷Earning per Share
पीई रेशो =शेअर ची सध्याची किंमत÷प्रती शेअर उत्पन्न
P/E रेशो चे प्रकार | Types of P/E Ratio in Marathi
पीई रेशो चे दोन प्रकार असतात.
1)Forward P/E Ratio
2)Trailing P/E Ratio
1)Forward P/E Ratio in Marathi
कंपनी भविष्यात कसा प्रदर्शन करेल याचा अंदाज लावण्यासाठी Forward P/E Ratio चा वापर केला जातो.हा रेशो कंपनीच्या शेअर च्या किंमतीला भविष्यातील होणाऱ्या कमाई नेे भागाकार करून काढला जातो.याला estimated pe रेशो असेही म्हटले जाते.
2)Trailing P/E Ratio in Marathi
कंपनीच्या शेअर च्या किंमतीला, कंपनीला मागील १२ महिन्यात झालेल्या प्रती शेअर earning ने भागून हा ratio काढला जातो.जो pe ratio वर सर्च केल्यावर किंवा कंपनीच्या वेबसाईट वर दिलेला असतो तो हाच असतो.या रेशो वरून कंपनी भविष्यात कसे प्रदर्शन करेल हे सांगता येत नाही.
P/E Ratio चे महत्त्व | P/E ratio Importance in Marathi
P/E Ratio be आपण कंपनीच्या शेअर क्या योग्य किंमतीचे अनुमान लावू शकतो.कंपनीचा शेअर undervalued आहे की overvalued याचा आपल्याला अंदाज लावता येतो.
कंपनीच्या शेअर चा P/E Ratio कमी आहे की जास्त हे त्या कंपनीच्या इंडस्ट्री च्या P/E Ratio सोबत तुलना करून बघितले पाहिजे.उदा.टीसीएस कंपनीच्या शेअर चा P/E Ratio कमी आहे की जास्त हे IT industry च्या P/E Ratio जवळ तुलना करून पाहिले पाहिजे.
पीई रेशो म्हणजे काय?(p/e ratio in Marathi) ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.