पालक पनीर रेसिपी | Palak Paneer Recipe in Marathi
पालक पनीर हे पालक सॉसमध्ये रसदार पनीर क्यूब्स (भारतीय कॉटेज चीज) सह बनवलेले सर्वात लोकप्रिय भारतीय पदार्थ पैकी एक आहे.
रोटी, नान किंवा परांठ्यापासून अगदी भाता सोबत हा खाल्ला जाणारा सर्वांत उत्तम उत्तर भारतीय पदार्थांपैकी एक आहे.
साहित्य
2 जुड्या पालक,
2 मोठे टोमॅटो,
200 ग्रॅम पनीर,
दीड टीस्पून मिरची पावडर,
1 टीस्पून मीठ,
2 टीस्पून साखर,
थोडासा हिरवा रंग,
2 टेबलस्पून तेल.
वाटण मसाला
1 इंच आले,7-8 लसूण पाकळ्या,4 हिरव्या मिरच्या,2 टीस्पून धने,1 टीस्पून जिरे,2 लवंग,3 वेलच्या,5-6 काळीमिरी दाणे,2-3 तुकडे दालचिनी,1 तमालपत्र,2 कांदे.
सर्वप्रथम सर्व मसाले बारीक वाटावेत,त्यानंतर कांदा चिरून घालावा. व परत सर्व बारीक एकत्र वाटावे.
कृती
सर्वप्रथम पालक धुवून त्यात 1 चिमूट सोडा व थोडे पाणी घालून उकडून घ्यावे.
त्यानंतर मिक्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट करावी. टोमॅटो वाटून त्याची पेस्ट करावी.
पनीरचे 1 इंचाचे तुकडे कापून तेलात तळून घ्यावेत.नंतर पातेलीत तेल घालावे.
तेल तापल्यावर त्यात वाटलेला मसाला,तिखट घालून तेल सुटेपर्यंत चांगला परतावा.
त्यात टोमॅटो चा रस घालून चांगले परतावे.
नंतर त्यात वाटलेला पालक,मीठ,साखर,रंग घालून उकळू द्यावे.
बेताची ग्रेव्ही करून त्यात तळलेला पनीर घालून गॅस बंद करावा.
- हे सुद्धा वाचा