साहित्य
दीड लिटर गाईचे दूध, एक टीस्पून आरारूट पावडर, अडीच वाट्या साखर, सात वाट्या पाणी,रोज इसेन्स,2 टीस्पून मावा, दोन टीस्पून पिठीसाखर, 1/2 टीस्पून सायट्रिक ऍसिड.
कृती
सर्वप्रथम दूध तापवून घ्यावे. त्यानंतर ते फ्रिज मधे थंड करून घ्यावे.त्याची मलई काढावी.
दूध पुन्हा उकळत ठेवावे.अर्धी वाटी गरम पाण्यात सायट्रिक ऍसिड एकत्र करावे व दूध उकळायला आल्यावर थोडे थोडे ऍसिड चे पाणी घालावे.
दूध फुटून चोथा व पाणी वेगळे झाल्यावर थोडा वेळ उकळू द्यावे.त्यानंतर पनीर गाळणीत काढावे.
पनीर थोडावेळ फडक्यात बांधून ठेवावे.किंवा हातात मुठीत घट्ट दाबून सर्व पाणी काढून टाकावे.
पनीर पूर्णपणे थंड झाले की ताटात काढून त्यामध्ये आरारुट घालून हाताने चांगले मऊ होईपर्यंत मळावे. पिठीसाखर व मावा एकत्र मिक्स करून ठेवावा.
पनीर चांगले मळल्यावर त्याचे गोळे करून घ्यावेत.प्रत्येक पनीरच्या गोळ्यामध्ये मावा भरावा व गोळा बंद करून घ्यावा.
साखर व पाणी एकत्र करून उकळत ठेवावे.
साखर विरघळून पाक उकळू लागल्यावर त्यात पनीरचे गोळे घालावेत.
5 मिनिटे मोठ्या गॅसवर पतेलीवर झाकण न ठेवता उकळवावेत.नंतर पंधरा मिनिटे मंद गॅसवर अर्धवट पतेलीवर झाकण ठेवून उकळवावे.
नंतर परत पाच मिनिटे मोठ्या गॅसवर पातेलीवर झाकण न ठेवता उकळावे. असे एकूण 25 मिनिटे रसगुल्ले उकळवावे व नंतर गॅस बंद करावा.
रसगुल्ले पाकातून बाहेर काढून ताटात ठेवावे व पाक थंड झाल्यावर पुन्हा पाकात ठेवावे.