नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात मी तुम्हाला बीटकॉइन बद्दल माहिती सांगणार आहे.(Bitcoin Information in Marathi)
गेल्या एक वर्षात बीटकॉइन हा चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडिया,टीव्ही सगळीकडे बीटकॉइन बद्दल बोलले जात आहे.अनेक जण यात गुंतवणूक करत आहेत.आज आपण बीटकॉइन काय आहे?बीटकॉइन कसा काम करतो?उपयोग काय आहेत? कसा खरेदी करायचा याबद्दल माहिती पाहणार आहोत.
बीटकॉइन म्हणजे काय? | Bitcoin Information in Marathi
बीटकॉइन एक डिजिटल अथवा वर्चुअल करन्सी आहे.बीटकॉइन ही सर्वात पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. बीट कॉइन ने आपण वस्तू किंवा सेवा यांची खरेदी विक्री करू शकतो आणि तेही कोणत्याही संस्थेच्या किंवा सरकारच्या नियंत्रणाशिवाय.तसेच कोणतेही दोन व्यक्ती जगात कुठूनही, सरकार बँक यांच्या सहभागाशिवाय एकमेकांना बिटकॉइन पाठवू शकतात.
बीटकॉइन आताच्या घडीला सर्वात प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे.2009 साली बीटकॉइन ची स्थापना सतोशी नाकामोटो नावाच्या अज्ञात व्यक्तीने केली होती.असे म्हटले जाते की बिटकॉइनचा पुरवठा 21 दशलक्ष नाण्यांपुरता मर्यादित आहे. ज्यापैकी 18.77 दशलक्ष आधीच माईन केले गेले आहे.
आता तुम्हाला बीटकॉइन म्हणजे काय (What is Bitcoin in Marathi) हे समजलं असेल.आता पाहुयात बीट कॉइन कसा काम करतो.
बीटकॉइन कसा काम करतो? | How Bitcoin works in Marathi
बिटकॉइन एखाद्या व्यक्तीच्या किंवा कोणत्याही कंपनीच्या मालकीचे नाही. बीट कॉइन हे जगातील पहिले ओपन पेमेंट नेटवर्क आहे. बीटकॉइन हे इंटरनेटवर वापरण्यासाठी डिझाइन केले होते आणि व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी बँक किंवा खाजगी कंपन्यांवर अवलंबून नाही.
बिटकॉइन हे ब्लॉकचेन नावाच्या वितरित डिजिटल रेकॉर्डसह तयार करण्यात आले आहे.ब्लॉकचेन हा एक प्रकारचा सार्वजनिक लेजर आहे.सार्वजनिक लेजर (Ledger) एक डिजिटल प्रणाली आहे ज्यामध्ये व्यवहार आणि त्याच्याशी संबंधित डेटा रेकॉर्ड केला जातो.हा डेटा एकाच वेळी अनेक ठिकाणी रेकॉर्ड केला जाऊ शकतो. ब्लॉकचेनमधील प्रत्येक ब्लॉक्स मध्ये व्यवहाराचा डेटा रेकॉर्ड केलेला असतो.तारीख, वेळ, किंमत, खरेदीदार आणि विक्रेता आणि प्रत्येक एक्सचेंजसाठी असणारा कोड असा सर्व डेटा प्रत्येक ब्लॉक मध्ये समाविष्ट असतो.
ब्लॉकचेन सिस्टम हे हॅक करण्यास किंवा त्यातील डेटा मध्ये छेडछाड करण्यास अत्यंत कठीण असते.त्यामुळे ते अत्यंत सुरक्षित मानले गेले आहे.शिवाय ब्लॉक चेन हे विकेंद्रित तंत्रज्ञान आहे.म्हणजेच कोणत्याही संस्थेद्वारे किंवा सरकारद्वारे ते नियंत्रित नसते.
कंप्युटर किंवा स्मार्टफोनवरील डिजिटल क्रिप्टोकरन्सी वॉलेट अॅप्लिकेशनमध्ये बिटकॉइन स्टोअर केले जातात. क्रिप्टोकरन्सी वॉलेट हे बिटकॉइन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोत्तम मार्गांपैकी एक मानले जाते.वॉलेटचेही अनेक प्रकार आहेत.
ऑफलाइन वॉलेट्स हे असे वॉलेट सॉफ्टवेअर असतात जे इंटरनेट ऐवजी USB किंवा थेट सीडीवर इंस्टॉल केले जातात. त्यामुळे ते भौतिकदृष्ट्या सुरक्षित ठेवता येते.
लोक बिटकॉइन वॉलेट-टू-वॉलेट ट्रान्सफरद्वारे एकमेकांना बिटकॉइन पाठवू शकतात.एका व्यक्तीच्या वॉलेटमधील बिटकॉइन पत्त्यावरून दुसऱ्या व्यक्तीच्या वॉलेटमधील बिटकॉइन पत्त्यावर बिटकॉइन पाठवले जाऊ शकतात.
बिटकॉईन कोणी बनवला? | Who Created Bitcoin in Marathi
2009 साली सतोशी नाकामोटो नावाच्या अज्ञात व्यक्तीने बीट कॉइन बनवला.या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.2008 साली या अज्ञात व्यक्तीने White Paper नावाने एक डॉक्युमेंट ऑनलाईन प्रकाशित केला.त्यामध्ये बीट कॉइन बद्दल माहिती दिलेली होती.
बीटकॉइन चा उपयोग | Use of Bitcoin in Marathi
बिटकॉइनचा वापर हा पेमेंट पर्याय म्हणून केला जातो.वस्तू आणि सेवा खरेदी केल्यानंतर पेमेंट म्हणून बीटकॉइन चा वापर केला जाऊ शकतो.परंतु पैश्याऐवजी बीटकॉइन पेमेंट म्हणून स्वीकारणाऱ्या दुकानदारांची संख्या अत्यंत कमी आहे.बीटकॉइन हा गुंतवणूक म्हणून सुद्धा खरेदी केला जातो.
बीटकॉइन कसा खरेदी करायचा? | How to Buy Bitcoin in Marathi
तुम्ही ऑनलाईन ऍप द्वारे bitcoin खरेदी करू शकता.खाली मी तुम्हाला काही अॅप्स ची नावे देत आहे ज्यावरून तुम्ही बीटकॉइन खरेदी करू शकता.
Binance
Coinbase
CoinDCX
Coinswitch
WazirX
Zebpay
बिटकॉईन चा इतिहास | History of Bitcoin in Marathi
- 2009 मध्ये सातोशी नाकामोटो या टोपणनावाने एका अज्ञात व्यक्तीने अथवा संस्थेने बिटकॉईन सादर केले होते. सतोशी नाकामोटो यांची ओळख आजही माहीत नाही.2009 मध्ये नाकामोटो यांनी “बिटकॉइन: पीअर-टू-पीअर इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टम” नावाचा श्वेतपत्र(White papers) पोस्ट केला. श्वेतपत्रिकेमध्ये बिटकॉइनची संकल्पना मांडली गेली होती.
- 2009 मध्ये, ब्लॉकचेन लाँच केले गेले. ब्लॉकचेनमधील पहिल्या ब्लॉकला जेनेसिस ब्लॉक असे टोपणनाव देण्यात आले.
- 22 मे 2010 रोजी बिटकॉइनचा पहिला आर्थिक व्यवहार झाला. 25 डॉलर मूल्याचे दोन पिझ्झा एका व्यक्तीने 10,000 बिटकॉइन देऊन विकत घेतले. 2021 च्या शेवटी, 10,000 बिटकॉइनची किंमत 600 दशलक्ष डॉलर पेक्षा जास्त होती.आज त्यांची किंमत 42 कोटी डॉलर पेक्षाही जास्त आहे.
- 2011 साली, बिटकॉइनचे मूल्य एप्रिलमध्ये $1 होते आणि जून 2011 पर्यंत ते $32 वर पोहोचले.
- 2013 मध्ये, बिटकॉइन एप्रिलपर्यंत $220 वर गेला, परंतु त्यानंतर मूल्य घसरले.
- 2017 च्या शेवट पर्यंत बिटकॉइनची किंमत $20,089 वर पोहोचली.
- नोव्हेंबर 2020 मध्ये, बिटकॉइनचा $18,353 वर होता.
- मार्च 2021 मध्ये, बिटकॉइनचे मूल्य $61,000 पेक्षा जास्त पोहोचले होते.त्यानंतर जुलै 2021 मध्ये ते कमी होऊन $31000 पर्यंत खाली गेले होते.
- आजच्या घडीला बिटकॉइन चे मूल्य $42000 पेक्षा जास्त आहे.
निष्कर्ष – बीटकॉइन काय आहे? संपूर्ण माहिती | Bitcoin Information in Marathi
जर तुम्हाला बीटकॉइन काय आहे?(Bitcoin Information in Marathi) ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.