साहित्य
2 वाट्या बासमती तांदूळ,4 वाट्या गरम पाणी,4 उकडलेली अंडी,2-3 चिरलेले कांदे,1 चिरलेला टोमॅटो,1/4 टीस्पून हळद,1 टीस्पून मीठ,3 टेबलस्पून तेल.
वाटण मसाला
4-5 ओल्या मिरच्या,अर्धा इंच आले,5-6 लसूण पाकळ्या,अर्धी वाटी कोथिंबीर,हे सर्व एकत्र बारीक वाटावे.
फोडणी
6-7 काळी मिरी,2-3 तुकडे दालचिनी,4 लवंग,4 वेलच्या,2 तमालपत्र,1 चिमुट शहाजिरे.
कृती
दोन तास आधी तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे.
एका पाटील तेल तापल्यावर फोडणीचे मसाले घालून त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा.
नंतर त्यात तांदूळ घालून गुलाबी रंगावर परतावेत.
त्यावर वाटलेला मसाला व टोमॅटो घालून पाच मिनिटे परतावे.
त्यात गरम पाणी ओतावे व मीठ व हळद घालून चांगले एकत्र करावे.
भातातील पाणी सुकल्यावर मंद गॅसवर पाटील वर घट्ट झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यावा व गॅस बंद करावा.
भात शिजल्यावर त्यात उकडलेले अंड्याचे 4-4 उभे भाग चिरून घालावे.
व अलगद एकत्र करून पाच मिनिटे झाकून ठेवावा व खावयास द्यावा.
माहिती आवडल्यास जरूर शेअर करा! धन्यवाद