शेअर मार्केटमध्ये ईपीएस (EPS) काय असते? | EPS Meaning in Marathi
आज आम्ही तुम्हाला EPS म्हणजे काय? ( EPS Meaning in Marathi), EPS ची गणना कशी केली जाते? EPS चे प्रकार किती आहेत? EPS चे महत्व काय आहे? याबद्दल माहिती सांगणार आहोत.
शेअर मार्केटमध्ये ईपीएस (EPS) काय असते? | EPS Meaning in Marathi
EPS चा फुल फॉर्म ‘Earning per Share’ असा आहे. Earning per Share म्हणजेच प्रति शेअर कमाई.कंपनी प्रत्येक शेअरच्या मागे किती नफा कमवते याची माहिती आपल्याला ईपीएस द्वारे मिळते.
EPS हा कंपनीच्या नफ्याचा भाग आहे जो शेअर च्या प्रत्येक वैयक्तिक समभागाला वाटप केला जातो.EPS हा गुंतवणूकदारांसाठी आणि शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कंपनीची प्रति शेअर कमाई जितकी जास्त असेल तितकाच तिचा नफा जास्त.
कंपनीमध्ये गुंतवलेल्या पैशावर किती परतावा मिळेल याचा अंदाज EPS वरून मिळू शकतो.कंपनीने आपला सर्व निव्वळ नफा शेअरधारकांमध्ये विभागला तर प्रत्येक शेअरमागे किती पैसे शेअरधारकाला मिळतील, त्यालाच अर्निंग पर शेअर म्हणतात.
ईपीएस कसा मोजला जातो | How to Calculate EPS in Marathi
आता तुम्हाला समजले असेलच की EPS म्हणजे काय?(EPS Meaning in Marathi). आता जाणून घेऊया EPS चा फॉर्म्युला काय आहे?ईपीएस कसा मोजला जातो.
प्रति शेअर कमाई (EPS) = निव्वळ नफा / शेअर्सची एकूण संख्या
EPS = Total net profit/Total number of shares
कोणत्याही कंपनीच्या प्रति शेअर कमाईची गणना करण्यासाठी, तुम्हाला त्या कंपनीचा निव्वळ नफा कंपनीच्या एकूण समभागांनी(शेअर) विभाजित करावा लागेल.
चला उदाहरणाने समजून घेऊ.
समजा XY कंपनीचा एकूण निव्वळ नफा 1 कोटी रुपये असेल आणि तिचे एकूण शेअर्स 5 लाख असतील तर त्या कंपनीचा EPS असेल :
EPS = एकूण निव्वळ नफा / एकूण समभागांची संख्या = 1 कोटी / 5 लाख = 20
म्हणजेच त्या कंपनीची प्रति शेअर कमाई(ईपीएस ) 20 रुपये आहे.
ईपीएस चे प्रकार | Types of EPS in Marathi
1) ट्रेलिंग ईपीएस(Trailing EPS) – कंपनीच्या मागील वर्षाच्या डेटाच्या आधारे हा ईपीएस मोजला जातो.
2) करंट ईपीएस(Current EPS) – कंपनीच्या चालू आर्थिक वर्षाच्या उपलब्ध डेटाच्या आधारे मोजला जातो.
3) फॉरवर्ड ईपीएस(Forward EPS) – भविष्यातील अंदाजे नफा घेऊन फॉरवर्ड ईपीएसची गणना केली जाते. नफा अंदाजानुसार असल्याने, हे गुणोत्तर अचूक असू शकत नाहीत.
नक्की वाचा :
सेन्सेक्स आणि निफ्टी
ईपीएस चे महत्त्व | Importance of EPS in Marathi
- गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम शेअर निवडण्यासाठी चांगल्या कंपन्यांच्या कामगिरीची तुलना करण्यात ईपीएस मदत करतो.
- उच्च ईपीएस म्हणजे जास्त नफा.उच्च ईपीएस आपल्याला सांगतो की कंपनी, कालांतराने, भविष्यात शेअरधारकांसाठी डिविडंड पेआउट वाढवू शकते.
- ईपीएस कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती समजण्यास मदत करतो.यासह भूतकाळातील कामगिरीचा मागोवा घेण्यात देखील मदत होते.
- कंपनीच्या आर्थिक स्थितीची तुलना करण्यासाठी ईपीएस चा वापर करू शकतो. स्थिर EPS वाढ असलेल्या कंपन्या एक चांगला गुंतवणूक पर्याय असू शकतात. परंतु अनियमित ईपीएस असलेल्या कंपन्या सामान्यतः गुंतवणूकदारांना आवडत नाहीत.
ईपीएस ची सीमा | Limits of EPS in Marathi
- कधी कधी कंपनीने व्यवसायात झालेल्या नफ्याशी छेडछाड करून ईपीएस वाढवलेला असू शकतो.त्यामुळे ईपीएस चांगला दिसतो.
- महागाईचा दर EPS मध्ये समाविष्ट नसल्यामुळे EPS चुकीचे आकडे देखील दर्शवू शकते.
- जर एखादी कंपनी तोट्यात चालली असेल तर तिचे EPS द्वारे योग्य मूल्यांकन करता येत नाही.
- कंपन्यांची नफा निश्चित करण्यासाठी कॅश फ्लो हा महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतुक कॅश फ्लो EPS मध्ये समाविष्ट नाही.
निष्कर्ष – शेअर मार्केटमध्ये ईपीएस (EPS) काय असते? | EPS Meaning in Marathi
कंपनीच्या ईपीएसची तुलना इतर कंपन्यांच्या ईपीएसशी केली पाहिजे.त्यामुळे तुम्हाला EPS कमी आहे की जास्त याचा अंदाज येईल. मित्रांनो, EPS आपल्याला योग्य शेअर मध्ये गुंतवणूक करण्यास मदत करते.
त्यामुळे गुंतवणूकदाराला EPS बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. शेअर्स खरेदी करण्यापूर्वी तुम्ही नेहमी कंपनीच्या EPS व्यतिरिक्त इतर बाबी पहाव्यात.
जसे की कंपनी किती नफा कमावते, तिच्यावर किती कर्ज आहे, इतर आर्थिक डेटा कसा आहे, व्यवस्थापन कसे आहे. सर्व पैलू तपासून योग्य शेअर निवडावा.फक्त EPS वर अवलंबून राहू नये.असा माझा सल्ला राहील.
मला अशा आहे की तुम्हाला ईपीएस (EPS Meaning in Marathi) बद्दलचा हा लेख जरूर आवडला असेल.
तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये हा लेख शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.
FAQ -शेअर मार्केटमध्ये ईपीएस (EPS) काय असते? | EPS Meaning in Marathi
ईपीएस म्हणजे काय? | EPS Meaning in Marathi
EPS चा फुल फॉर्म ‘Earning per Share’ असा आहे. Earning per Share म्हणजेच प्रति शेअर कमाई.कंपनी प्रत्येक शेअरच्या मागे किती नफा कमवते याची माहिती आपल्याला ईपीएस द्वारे मिळते.
ईपीएस चे प्रकार | Types of EPS in Marathi
1.ट्रेलिंग ईपीएस
2.करंट ईपीएस
3.फॉरवर्ड ईपीएस
ईपीएस चा फॉर्मुला | EPS formula in Marathi
प्रति शेअर कमाई (EPS) = निव्वळ नफा / शेअर्सची एकूण संख्या