आजकाल प्रत्येक जण मोबाईल चा वापर करत आहे.मोबाईल वरून विविध कामे करता येतात.ऑनलाईन घरबसल्या पैसेही कमवता येतात.आज मी तुम्हाला इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?(How to Earn Money from Instagram in Marathi) याबद्दल माहिती सांगनार आहे.
इंस्टाग्राम ची सुरुवात 2010 साली झाली होती.सुरुवातीला हे एक फोटो शेअरिंग ऍप म्हणून ओळखले जायचे.आज इंस्टाग्राम एक मोठा व जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. सध्या इंस्टाग्रामचे सुमारे 1.5 बिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.Statista या वेबसाईट च्या म्हणण्यानुसार भारतात 201 मिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.आज हजारो लोक इंस्टाग्रामचा वापर करून पैसे कमवत आहेत.चला तर मग पाहुयात इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?
How to Earn Money from Instagram in Marathi | इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?
स्पॉन्सर पोस्ट
तुम्ही तुमच्या प्रोफाइल वर वेगवेगळ्या ब्रँड्स च्या विविध प्रॉडक्ट्स चे प्रमोशन करू शकता.जर तुमच्याकडे चांगले फॉलोव्हर्स असतील तर हे करणे तुम्हाला अधिक सोपे जाईल.विविध ब्रँड्स हे त्यांच्या प्रॉडक्ट्स चे सोशल मीडिया वर प्रमोशन करण्यासाठी पैसे देतात.
जर तुमचे फॉलोव्हर्स जास्त असतील तर ब्रँड्स स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचतील.किंवा तुम्ही स्वतः एखाद्या ब्रँड शी संपर्क करू शकता.स्पॉन्सर पोस्ट्समधून पैसे कमविण्याच्या प्रक्रियेत आपल्या फॉलोव्हर्स चा विश्वास गमावू नये याची नेहमी काळजी घ्या.स्पॉन्सर पोस्ट करताना #ad किंवा #sponsored असा इन्स्टाग्राम हॅशटॅग वापरणे नेहमी चांगले असते.कारण यामुळे ही एक स्पॉन्सर पोस्ट आहे हे लोकांना समजते.
अफीलिएट
तुम्ही दुसऱ्या लोकांचे प्रॉडक्ट्स इंस्टाग्राम वरून विकू शकता.आणि त्याबदल्यात कमिशन मिळवू शकता.तुमच्या प्रोफाइल वर लिंक वगैरे देऊ शकता.त्या लिंक वरून कोणी वस्तू विकत घेईल त्याबद्दल तुम्हाला कमिशन मिळेल.अमेझॉन चा अफिलियेट प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकता.आणि अफिलिएट मार्केटिंग सुरू करू शकता.
तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट्स विका
तुम्ही पोस्टर, फोटो, पेंटिंग, ड्रॉइंग, इमेज किंवा व्हिडिओ-आधारित उत्पादने विकू शकता. इंस्टा ग्राम वरून पैसे कमवण्याचा हा एक लोकप्रिय मार्ग आहे.शिवाय टी शर्ट,घरी बनविलेल्या वस्तू या सुद्धा तुम्हाला विकता येतील.
इन्स्टाग्राम वर फॉलोव्हर्स कसे वाढवावेत? | How to Grow Followers on Instagram in Marathi
चांगला प्रोफाइल बनवा
सोपे व सुंदर असे यूजर नेम ठेवा.तुमचा बायो कमीत कमी 150 शब्दांचा ठेवा.प्रोफाइल नेहमी आकर्षक ठेवा.
हॅश टॅग वापरा
इन्स्टाग्राम एक पोस्ट वर जास्तीत जास्त 30 हॅश टॅग वापरण्यास परवानगी देतो.तुम्ही नेहमी 5-10 चांगले हॅश टॅग वापरा.
चांगले कॅप्शन वापरा
इन्स्टाग्राम पोस्ट चे कॅप्शन हे देखील महत्त्वाचे असतात.चांगले कॅप्शन वापरल्यास अधिक लोक जुळतील.
इन्स्टाग्राम स्टोरीज बनवा
इंस्टाग्राम स्टोरीज हा इंस्टाग्रामचा एक मोठा भाग बनला आहे.अनेक इंस्टाग्राम स्टोरीज पसंत करतात. तुमचे प्रेक्षक तयार करण्यासाठी तुम्ही इन्स्टाग्राम स्टोरीज वापरू शकता.
रिल्स बनवा
इन्स्टाग्राम रिल्स या कमी वेळात फेमस झाल्या आहेत.काही लोक तर नुसता रिल्स बनवून पैसे कमवत आहेत.तुमचे फॉलोवर वाढवण्यासाठी रिल्स हा एक उत्तम मार्ग असू शकतो.
नियमितपणे पोस्ट अपलोड करा
नियमितपणे पोस्ट करत रहा.कामात सातत्य ठेवल्यास नक्की यश मिळेल.चांगल्या व उपयोगी पोस्ट करत रहा त्यामुळे तुमचे फॉलोवर वाढतील.
निष्कर्ष
यशस्वी Instagrammers पासून विविध गोष्टी शिका. मार्केटिंग, फोटोग्राफी, स्टोरीटेलिंग आणि फोटो स्टाइलिंग अशी विविध कौशल्ये वापरा. त्यांच्याकडून काय शिकलात ते एकत्र करा. तुमचे फॉलोअर्स शक्य तितके वाढवण्याचा प्रयत्न करा.दिवसातून एकदा किंवा दोनदा नवीन फोटो पोस्ट करून सक्रिय रहा.
इंस्टाग्राम हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्यामुळे त्याचा चांगला वापर केल्यास पैसे कमविणे सोपे आहे.स्पॉन्सर पोस्ट्सपासून ते सोशल मीडिया मार्केटिंग सेवांपर्यंत, इन्स्टाग्रामवर पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत.
जर तुम्हाला (How to Earn Money from Instagram in Marathi) इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे? ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.