मालवणी चिकन मसाला रेसिपी | Malvani Chicken Masala Recipe in Marathi
ज्यांना मसालेदार अन्न आवडते त्यांच्यासाठी ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. मालवणी चिकन मसाला एक चटपटीत आणि चविष्ट चिकन रेसिपी आहे.ही खाल्ल्यानंतर त्याची चव तुम्ही अनेक दिवस विसरू शकणार नाही.
साहित्य
1 किलो चिकन,1 टोमॅटो,3-4 टीस्पून तिखट,2 टेबलस्पून तेल,1/4 टीस्पून हळद,2 टीस्पून मीठ,4 मध्यम कांदे.
वाटण मसाला 1
2 इंच आले,कोथिंबीर,8-10 लसूण पाकळ्या ई. साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.
वाटण मसाला 2
4 तुकडे दालचिनी,जायफळ,1 चिमूट शहाजिरे,1/4 काळीमिरी,2 वेळच्या,2 तमालपत्र,2-3 लवंग,1/2 टीस्पून धणे,1/4 टीस्पून बडीशेप,1/2 टीस्पून खसखस,
वाटण मसाला 3
2 कांदे,3 टेबलस्पून सुके खोबरे,1 टेबलस्पून ओले खोबरे.
प्रथम 1/2 टीस्पून तेल कढईत तापवून त्यावर वाटण मसाला 2 चे सर्व गरम मसाले घालून मंद गॅसवर परतावेत व काढून ठेवावेत.नंतर कढईत सुके खोबरे घालून गुलाबी रंगावर भाजावे व काढून ठेवावे.नंतर कढईत 1 टीस्पून तेल घालून त्यावर 2 कांदे चिरून घालावेत व मंद गॅसवर गुलाबी रंगावर भाजावेत.कांदा गुलाबी झाल्यावर त्यातच ओले खोबरे घालून थोडे परतावे.नंतर मसाला न.2 चे सर्व गरम मसाले कोरडेच मिक्सरमधे बारीक वाटावेत.नंतर त्यावर भाजलेले कांदा व खोबरे घालून सर्व एकत्र बारीक वाटावे.
फोडणी
2 तमालपत्रे,2 वेलच्या,2 लवंग,1 दालचिनी
कृती
चिकन चे बारीक तुकडे करून त्याला हळद,थोडे मीठ,वाटलेले आलं,लसूण,व कोथिंबीर लावून ठेवावे.नंतर पातेली तापल्यावर दीड टेबलस्पून तेल घालावे.त्यात फोडणीचे मसाले घालून चिरलेले 2 कांदे घालावेत.कांदा गुलाबी रंगावर परतावा.कांदा गुलाबी झाल्यावर त्यात 1 टोमॅटो चिरून घालावा व चांगले परतावे.टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात तिखट घालून थोडे परतावे.नंतर चिकनचे तुकडे घालून सर्व परतावे व 1 वाटी गरम पाणी घालून मंद गॅसवर वाफेवर शिजत ठेवावे.1 शिजले की त्यात मसाला नंबर 2 व 3 चे वाटण व मीठ घालावे.थोडे गरम पाणी घालावे व सर्व एकत्र करून मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटे शिजू द्यावे.त्यानंतर गॅस बंद करावा. ग्रेव्ही बेताचीच करावी.