कुरकुरीत मेदु वडा रेसिपी | Medu Vada Recipe in Marathi
मेदू वडा हे दक्षिण भारतीय पाककृतीतील कुरकुरीत, मऊ, मऊ आणि स्वादिष्ट डिश आहे.
मेदू म्हणजे मऊ आणि वडा म्हणजे फ्रिटर. हे न्याहारी, स्नॅक्स किंवा जेवणासाठी दिले जाणारे अतिशय लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहेत. हे हॉटेल आणि टिफिन सेंटरमध्ये देखील दिले जातात.
वडे
साहित्य
3 वाट्या उडदाची डाळ,1 टीस्पून मीठ,3 ओल्या मिरच्या,अर्धा इंच आले.
कृती
रात्री डाळ भिजत घालावी.सकाळी डाळीतील पाणी निथरून डाळ जाडसर वाटावी.
त्यात मीठ व आले बारीक चिरून घालावे.
नंतर चांगले एकत्र करून प्लास्टिक ला तेलाचा हात लावून लिंबाएवढा वड्याचा गोळा बनवून घेऊन जाडसर थापावे व मध्ये भोक पाडावे.
कढईत तेल चांगले कडकडीत तापल्यावर एकेक वडा सोडावा म्हणजे वडा फुगून वर येईल.
वडा दोन्ही बाजूंनी लाल झाल्यावर बाहेर काढावा.
सांबार
साहित्य
2 वाट्या तुरीची डाळ,4 वांगी,2 टोमॅटो,2 मोठे कांदे,कोथिंबीर, लिंबाएवढी चिंच, मोठ्या लिंबाएवढे गुळ
सांबार मसाला
2 टीस्पून धने,1 टीस्पून जिरे,2 टीस्पून चणाडाळ,1 टीस्पून उडद डाळ,2 लवंग,2 ते 3 तुकडे दालचिनी,7-8 मिरिदाने,10-12 मेथी दाणे.
कृती
1 टीस्पून तेलात सर्व मसाले मंद गॅसवर गुलाबी रंगावर भाजावेत.थंड झाल्यावर मिक्सरमधे कोरडे वाटावेत.
सांबार
कांदा उभा चिरून घ्यावा.वांगी व टोमॅटो मध्यम चिरावेत.
कुकर मध्ये डाळ व सर्व भाज्या वेगवेगळे शिजवून घ्यावे.
पातेलीत अर्धा टीस्पून तेल घालावे.तेल तापल्यावर अर्धा टीस्पून मोहरी,1/4 टीस्पून जिरे,1/4 टीस्पून हिंग व 10-12 कढीपत्त्याची फोडणी द्यावी.
त्यात शिजलेली डाळ घालावी व 4-5 वाट्या पाणी घालून बेताची पातळ करावी.
त्यानंतर त्यात शिजलेल्या भाज्या,कांदा,2 टीस्पून तिखट,थोडी हळद, लिंबाएवढा चिंच,मोठ्या लिंबाएवढा गुळ,वाटलेला सांबार मसाला व कोथिंबीर घालावी.
सांबार चांगले उकळून गॅस बंद करावा.
आणि आपला मेदू वडा व सांबार तयार झाला.
- हे सुद्धा वाचा