मेथी पराठा आपल्या तोंडाला पाणी सुटणाऱ्या पदार्थांपैकी एक स्वादिष्ट पदार्थ आहे. मेथी पराठा मेथीची पाने, गव्हाचं पीठ, हिरव्या मिरच्या, दही इतक्या कमी सामग्रीमध्ये बनणारी सोपी पाककृती आहे.
तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व कमी वेळात तयार होणाऱ्या रेसिपीचा शोध घेत असाल तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. मेथी पराठा हा चहा,दही किंवा आचार सोबत खाल्ला जातो.
साहित्य
2 वाट्या चिरलेली मेथी,
2 वाट्या गव्हाचे पीठ,
1 वाटी ज्वारीचे पीठ,
1 वाटी चण्याचे पीठ,
1/4 टीस्पून हळद,
दीड टीस्पून मिरची पावडर,
1/3 टीस्पून कुटलेला ओवा,
2 टीस्पून साखर,
1 टीस्पून मीठ,
एक लिंबाचा रस,
तेल.
वाटण मसाला
2 टीस्पून धने,
4 हिरव्या मिरच्या,
7-8 लसूण पाकळ्या,
अर्धा इंच आले,
अर्धा टीस्पून जिरे.हे सर्व एकत्र वाटून घ्यावे.
कृती
मेथित मीठ,साखर,लिंबू,ओवा,तिखट,वाटलेला मसाला,हळद घालून चांगले मळावे.
व त्यात सर्व पीठ घालून घट्ट पीठ भिजवावे.
पिठात 2 टेबलस्पून तेल घालून चांगले मळावे व गोळे करावेत.
घडीच्या पोळीप्रमाने मध्ये तेल लावून त्रिकोणी जाड पराठे लाटावेत व तव्यावरून तेल सोडून गुलाबी रंगावर भाजून काढावेत.