Programming in Marathi | प्रोग्रामिंग म्हणजे काय?
जगामध्ये आत्ताच्या काळात प्रोग्रामिंगला खूप लोकप्रियता मिळाल्याबद्दल आपण सर्वांनी ऐकले आहे.आजच्या जगात,आपण सर्वजण प्रोग्रामिंग करून तयार केलेल्या विविध सॉफ्टवेअर वर खूप अवलंबून आहोत.आपण जे मोबाईल मध्ये अॅप वापरतो ते प्रोग्रामिंग ने तयार केले गेले आहेत.कॉम्प्युटर मधील गेम्स, अॅप हे सर्व प्रोग्रामिंग च्या मदतीने तयार झाले आहे. प्रोग्रामिंग ही काळाची गरज बनली आहे.पण प्रोग्रामिंग म्हणजे नक्की आहे तरी काय? चला तर मग जाणून घेऊया प्रोग्रामिंग म्हणजे काय?(Programming in Marathi).
या पोस्ट मध्ये मी तुम्हाला प्रोग्रामिंग म्हणजे काय?विविध प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या?, प्रोग्रामिंग कशी शिकायची?, प्रोग्रामिंग चे फायदे या सगळ्यां बद्दल माहिती देणार आहे.
प्रोग्रामिंग म्हणजे काय? | Programming in Marathi
“प्रोग्रामिंग ही मशीनला सूचनांचा संच देण्याची प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्रोग्राम कसा चालवायचा याबद्दल चे वर्णन केले जाते.”
प्रोग्रामिंग म्हणजे “कॉम्प्युटरला विविध कामे करण्यासाठी सूचना” देण्याचा मार्ग आहे.
“संगणक प्रोग्रामिंग ही अशी प्रक्रिया आहे जी व्यावसायिक कोड लिहिण्यासाठी वापरतात जी संगणक, ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर प्रोग्राम कसे कार्य करते याची माहिती देते.”
“प्रोग्रामिंग म्हणजे संगणकाला कार्यान्वित करण्यासाठी सूचनांचा संच देणे.”
जसे आपण माणसे काही भाषा जसे की मराठी,हिंदी,इंग्रजी इ. समजू शकतो, तसेच संगणकाच्या बाबतीतही आहे. संगणक हे विशिष्ट वाक्यरचनेच्या स्वरूपात लिहिलेल्या सूचना समजतात ज्याला प्रोग्रामिंग भाषा म्हणतात.संगणकावरून आपण विविध कामे करू शकतो जसे की चित्र काढणे,ऑनलाईन पेमेंट करणे,गेम्स खेळणे, मॅसेज पाठवणे इ.पण हे सगळे शक्य आहे ते फक्त प्रोग्रामिंग मुळे.यामुळे प्रोग्रामिंग चे आजच्या काळात किती महत्त्व आहे हे आपल्याला समजते.
प्रोग्रामिंग चे मूलभूत घटक | Basics of Programming in Marathi
मराठी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय भाषा आहे.आपल्या मराठी भाषेत स्वतःचे व्याकरण नियम आहेत, जे आपल्याला योग्यरित्या लिहिण्यासाठी पाळावे लागतात.कोणतीही भाषा (जसे की मराठी,हिंदी,इंग्रजी, स्पॅनिश, इ.) अनेक घटकांनी बनलेल्या असतात जसे की नाम,सर्वनाम, विशेषण, क्रियापद,क्रियाविशेषण इ.
तसेच प्रोग्रामिंग भाषा या विविध मूलभूत घटकांनी बनलेले असतात. मानवी भाषांप्रमाणेच, प्रोग्रामिंग भाषा देखील व्याकरणाचे अनुसरण करतात ज्याला सिंटॅक्स (Syntax) म्हणतात.
काही मूलभूत प्रोग्राम कोड घटक आहेत जे सर्व प्रोग्रामिंग भाषांसाठी समान आहेत.प्रोग्रामिंग भाषांसाठी सर्वात महत्वाचे मूलभूत घटक खालीलप्रमाणे आहेत:
- Programming Environment
- Data Types
- Variables
- Keywords
- Logical and Arithmetical Operators
- If else conditions
- Loops
- Numbers, Characters and Arrays
- Functions
- Input and Output Operations
प्रोग्रामिंग लँग्वेज | Programming Languages in Marathi
जगात अनेक प्रोग्रामिंग भाषा अस्तित्वात आहेत.त्यातील काही प्रसिद्ध भाषा पुढीलप्रमाणे:
- Python
- C
- C++
- Java
- JavaScript
- Mysql
- PHP
- Kotlin
- Swift
- R
- C#
- Ruby
प्रोग्रामिंग का शिकावी? | Why to Learn Programming in Marathi
प्रोग्रामिंग शिकणे खूप मजेदार आहे.प्रोग्रामिंग भाषा वापरून, तुम्ही स्वतःचे गेम,वेबसाईट,इंस्टाग्राम, व्हॉटसअप सारखी सोशल नेटवर्किंग साइट बनवू शकता.तुमचा स्वतःचा गेम तयार करून तो प्ले स्टोअरवर टाकू शकता.त्यातून पैसे कमवू शकता.प्रोग्रामर ना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
प्रोग्रामिंग कशी शिकावी? | How to Learn Programming in Marathi
बारावी नंतर तुम्ही B.tech कॉम्प्युटर सायन्स किंवा B.tech कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा चार वर्षाचा कोर्स करू शकता.याशिवाय B.Sc आयटी व B.Sc कॉम्प्युटर सायन्स हा तीन वर्षांचा कोर्स उपलब्ध आहे ज्यातून तुम्ही प्रोग्रामिंग शिकू शकता.
जर तुम्हाला स्वतःहून प्रोग्रामिंग शिकायची असेल तर यूट्यूब व गुगल वरून तुम्ही शिकू शकता.यूट्यूब वर अनेक व्हिडिओज मिळतील ज्यातून तुम्ही प्रोग्रामिंग शिकू शकता.
Udemy या वेबसाइट वरून तुम्ही प्रोग्रामिंग चे विविध कोर्स करू शकता.शिवाय प्रोग्रामिंग बद्दल विविध पुस्तके उपलब्ध आहेत.ज्यातून तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकता.
प्रोग्रामिंग शिकल्यानंतर तुम्हाला कोणती नोकरी मिळू शकते? | Programming Jobs in Marathi
- Web Developer
- UI Developer
- User Experience Designer
- SQL Developer
- Quality Assurance
- Automation Test Engineer
- Software Engineer
- Database Administrator
- Network system Administrator
प्रोग्रामिंग साठी कोणती कौशल्य पाहिजेत? | Skills for Programming in Marathi
आत्मविश्वास: प्रोग्रामिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी, तुम्ही स्वत:मध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे.तुम्हाला येणाऱ्या तांत्रिक समस्या दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः सोडवल्या पाहिजे.तुम्ही तुमच्या क्षमता, आणि तुमच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवा. प्रोग्रामिंग शिकताना चिकाटी ठेवा.
तर्क: प्रोग्रामिंग भाषेत उत्कृष्ट होण्यासाठी, एखाद्याने नेहमी तर्क लावून विचार केला पाहिजे.
संयम: काही वेळा, आपण प्रोग्रामिंग करताना असे घडते की आपल्याला लगेच काही गोष्टी समजत नाहीत.अशा काळात, परिस्थितीवर मात करण्याची क्षमता, सुरवातीपासून पुन्हा प्रयत्न करणे आणि संयम ठेवणे हे महत्त्वाचे असते.
निष्कर्ष
आजच्या काळात प्रोग्रामिंग हा आपल्या जीवनाचा एक मोठा भाग बनत आहे.प्रत्येकाला प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि ते कसे शिकावे हे समजून घेणे आवश्यक आहे. प्रोग्रामिंग हे आपल्या करिअरसाठी महत्त्वाचे आहे.
प्रोग्राम शिकणे सुरुवातीला कठिण असू शकते,जर तुम्ही त्यात टिकून राहिलात तर तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल.कॉम्प्युटर प्रोग्रामिंग हे आर्थिक दृष्ट्या खूप फायदेशीर करियर असू शकते.
वेब डेव्हलपमेंट,गेम डेव्हलपमेंट , सिस्टीम इंजिनीअर यासारखे व अन्य बरेच फिल्ड आहेत ज्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. यातील काही क्षेत्रांना व्यावसायिक शिक्षणाची आवश्यकता असते.तर काही स्वयं-शिक्षित प्रोग्रामरसाठी सुद्धा संधी उपलब्ध असतात. असतात.
जर तुम्हाला प्रोग्रामिंग म्हणजे काय?(Programming in Marathi) ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.