आज या लेखात सेन्सेक्स म्हणजे काय? निफ्टी म्हणजे काय?(Sensex and Nifty in Marathi),त्यातील फरक काय? सेन्सेक्स व निफ्टी कसे मोजले जातात याबद्दल माहिती पाहणार आहोत.
इंडेक्स म्हणजे काय? | What is Index in Marathi
सेन्सेक्स व निफ्टी बद्दल माहिती घेण्याआधी आपण इंडेक्स म्हणजे काय याची माहिती घेऊयात.इंडेक्स चा अर्थ आहे निर्देशांक.स्टॉक एक्स्चेंजमध्ये हजारो कंपनी सूचीबद्ध आहेत.त्यामुळे आपण मार्केटच्या परफॉर्मन्स चे मूल्यांकन करण्यासाठी एका वेळी विविध कंपनीच्या शेअर चे मूल्यांकन करू शकत नाही.त्याला पर्याय म्हणून शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचा एक लहान नमुना घेतला जातो.हा नमुना संपूर्ण मार्केटचा प्रतिनिधी असतो.या नमुन्यालाच आपण इंडेक्स असे म्हणतो.इंडेक्स हा विविध उद्योग क्षेत्रातील सूचीबद्ध कंपन्यांचा नमुना असतो.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज | Bombay Stock Exchange(BSE) Information in Marathi
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(BSE) भारतीय स्टॉक एक्सचेंज आहे.दलाल स्ट्रीट, मुंबई येथे हा स्टॉक एक्सचेंज आहे.याची स्थापना 1875 साली झाली असून हा आशिया खंडातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे.बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये सुमारे 5000 पेक्षा जास्त कंपन्या सूचीबद्ध आहेत.बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा जगातील नववा सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे.
सेन्सेक्स म्हणजे काय? | What is Sensex in Marathi
Sensitive व Index या दोन शब्दांपासून सेन्सेक्स हा शब्द बनला आहे.सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(BSE) चा इंडेक्स(निर्देशांक)आहे.या स्टॉक एक्सचेंज मध्ये जवळजवळ 5000 कंपन्या सूचीबद्ध आहेत.सेन्सेक्समध्ये प्रामुख्याने भारतातील 30 मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.सेन्सेक्स ची बेस वॅल्यू 100 आहे. सेन्सेक्स मध्ये निवडली जाणारी कंपनी ही बाजार भांडवल,तरलता व अन्य काही मुद्द्यांचा आधारे निवडली जाते.तसेच, एखाद्या कंपनीला सेन्सेक्सवर येण्यासाठी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर वर सूचीबद्ध असणे आवश्यक आहे.
सेन्सेक्स खाली गेल्यास,बीएसईवरील बहुतेक प्रमुख कंपन्यांच्या शेअर ची किंमत कमी झालेली असते.आणि जर सेन्सेक्स वर गेला तर याचा अर्थ असा की बीएसई मधील बहुतेक प्रमुख कंपन्यांच्या शेअर ची किंमत वाढली.आता तुम्हाला सेन्सेक्स काय आहे(Sensex in Marathi) हे समजलं आहे.आता आपण पाहुयात सेन्सेक्स मध्ये असणाऱ्या 30 कंपन्या.
सेन्सेक्स मध्ये असणाऱ्या 30 कंपन्या | Companies in Sensex in Marathi
1. | Reliance Industries Ltd. |
2. | HDFC Bank Ltd. |
3. | Infosys Ltd. |
4. | Housing Development Finance Corporation Ltd. |
5. | ICICI Bank Ltd. |
6. | Tata Consultancy Services Ltd. |
7. | Kotak Mahindra Bank Ltd. |
8. | Hindustan Unilever Ltd. |
9. | Larsen & Toubro Ltd. |
10. | ITC Ltd. |
11. | Bajaj Finance Ltd. |
12. | AXIS Bank Ltd. |
13 | Bharti Airtel Ltd. |
14. | State Bank of India |
15. | Asian Paints Ltd. |
16. | HCL Technologies Ltd. |
17. | Bajaj Finserv |
18. | Tata Steel Ltd. |
19. | Tech Mahindra Ltd. |
20. | Maruti Suzuki India Ltd. |
21. | Titan Company Ltd. |
22. | UltraTech Cement Ltd. |
23. | Sun Pharmaceutical Industries Ltd. |
24. | Mahindra & Mahindra Ltd. |
25. | Nestle India Ltd. |
26. | IndusInd Bank Ltd |
27. | POWERGRID |
28. | NTPC Ltd. |
29. | Dr. Reddy |
30. | Bajaj Auto Ltd. |
नॅशनल स्टॉक एक्सचेंज | National Stock Exchange (NSE) Information in Marathi
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) हा भारतातील आघाडीचा स्टॉक एक्सचेंज आहे.हा स्टॉक एक्सचेंज मुंबई येथे स्थित आहे.NSE मध्ये 2000 पेक्षा जास्त कंपन्या सूचीबद्ध आहेत.NSE ची स्थापना 1992 मध्ये झाली. देशातील पहिले डिमटेरियलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज म्हणून NSE ची स्थापना झाली.NSE हा देशातील पहिला एक्सचेंज होता ज्याने इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्रणाली उपलब्ध करून दिली होती. सध्या NSE जगातील 10 वा सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे.
निफ्टी म्हणजे काय? | What is Nifty in Marathi
National आणि Fifty या दोन शब्दांपासून निफ्टी तयार झाला आहे.निफ्टी हा भारताच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये(NSE) सूचीबद्ध असलेल्या 50 मोठ्या कंपन्यांचा समावेश असलेला इंडेक्स(निर्देशांक)आहे. जसा सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(BSE) चा इंडेक्स आहे तसा निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा इंडेक्स आहे.निफ्टी ला निफ्टी 50 म्हणून ओळखले जाते.निफ्टी ची बेस वॅल्यू 1000 आहे.निफ्टी मध्ये समावेश असलेल्या कंपन्या या विविध क्षेत्रातील असतात.
निफ्टी मध्ये असणाऱ्या कंपन्या | Companies in Nifty in Marathi
1 | Reliance Industries Ltd. |
2 | Infosys Limited |
3 | HDFC Bank Ltd. |
4 | ICICI Bank Ltd. |
5 | Housing Development Fin. Corp. Ltd.£ |
6 | Tata Consultancy Services Ltd. |
7 | Kotak Mahindra Bank Limited |
8 | Larsen and Toubro Ltd. |
9 | Hindustan Unilever Ltd. |
10 | ITC Ltd. |
11 | Bajaj Finance Ltd. |
12 | State Bank of India |
13 | Axis Bank Ltd. |
14 | Bharti Airtel Ltd. |
15 | Asian Paints Limited |
16 | HCL Technologies Ltd. |
17 | Tech Mahindra Ltd. |
18 | Wipro Ltd. |
19 | Titan Company Ltd. |
20 | Bajaj Finserv Ltd. |
21 | Maruti Suzuki India Limited |
22 | Sun Pharmaceutical Industries Ltd. |
23 | Tata Steel Ltd. |
24 | UltraTech Cement Limited |
25 | Tata Motors Ltd. |
26 | Mahindra & Mahindra Ltd. |
27 | Nestle India Ltd. |
28 | Power Grid Corporation of India Ltd. |
29 | Hindalco Industries Ltd. |
30 | JSW Steel Ltd. |
31 | Grasim Industries Ltd. |
32 | HDFC Life Insurance Company Limited |
33 | Divis Laboratories Ltd. |
34 | Dr Reddys Laboratories Ltd. |
35 | NTPC Limited |
36 | Indusind Bank Ltd. |
37 | Adani Ports & Special Economic Zone |
38 | SBI Life Insurance Company Ltd. |
39 | Oil & Natural Gas Corporation Ltd. |
40 | Cipla Ltd. |
41 | Tata Consumer Products Limited |
42 | Bajaj Auto Limited |
43 | Britannia Industries Ltd. |
44 | UPL Ltd. |
45 | Bharat Petroleum Corporation Ltd. |
46 | Eicher Motors Ltd. |
47 | Shree Cement Ltd. |
48 | Hero MotoCorp Ltd. |
49 | Coal India Ltd. |
50 | Indian Oil Corporation Ltd. |
सेन्सेक्स कसा मोजला जातो | How Sensex is Calculated in Marathi
सेन्सेक्सची गणना सेन्सेक्स मध्ये समाविष्ट असणाऱ्या 30 कंपन्यांच्या फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन आणि सेन्सेक्सच्या बेस वॅल्यू च्या आधारे केली जाते.
सर्वप्रथम सेन्सेक्स मध्ये समाविष्ट असणाऱ्या 30 कंपन्यांचे बाजार भांडवल(मार्केट कॅपिटलायझेशन) मोजले जाते.
त्यानंतर कंपन्यांचे फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन मोजले जाते.सर्व कंपन्यांचे फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन एकत्र मिळवून,त्यानंतर टोटल फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन काढले जाते.
सेन्सेक्स वॅल्यू = (30 कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन / बेस मार्केट कॅपिटलायझेशन) * इंडेक्सची(निर्देशांक) बेस वॅल्यू
मार्केट कॅपिटलायझेशन हे कंपनीच्या एकूण शेअर्स ची संख्या व एका शेअर ची किंमत यांचा गुणाकार करून काढले जाते.उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीचे एकूण 10 लाख शेअर्स असतील आणि एक शेअरची किंमत 50 रुपये असेल, तर कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन(बाजार भांडवल) 5 करोड रुपये इतके आहे.
बेस मार्केट कॅपिटलायझेशन INR 2501.24 कोटी आहे. हे 1978-79 मधील सेन्सेक्सच्या मार्केट कॅपिटलायझेशन मूल्य आहे.तर बेस वॅल्यू 100 आहे.
निफ्टी कसा मोजला जातो | How Nifty is Calculated in Marathi
निफ्टी वॅल्यू = (वर्तमान बाजार मूल्य / बेस बाजार भांडवल) * बेस इंडेक्स वॅल्यू
बेस बाजार भांडवल = Rs.2.06 ट्रिलियन
बेस इंडेक्स वॅल्यू =1000
निष्कर्ष
मला अशा आहे की आता तुम्हाला सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय(Sensex and Nifty in Marathi ) याबाबत ची माहिती आवडली असेल.
जर तुम्हाला सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय?(Sensex and Nifty in Marathi) बद्दलचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.
आपण दिलेली माहिती अगदी साध्या सोप्या शब्दात होती ती पटकन कळाली
धन्यवाद