शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर या 8 टिप्स नक्की वाचा | Share Market Tips in Marathi
आजकाल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.कोरोनाच्या महामारीनंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी लोकांची आवड वाढली आहे.शेअर बाजारात गुंतवणूक करून भरपूर पैसे कमवायची अनेकांची इच्छा असते.
परंतु अनेकजण विचार न करता शेअर बाजारात पैसे गुंतवतात आणि त्यांचे नुकसान होते. म्हणूनच आज मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याच्या काही टिप्स सांगणार आहे(Share Market Tips in Marathi) जेणेकरून तुम्ही नुकसान टाळू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.
Share Market Tips in Marathi – सर्वात आधी शिका
शेअर मार्केटमध्ये कधीही माहिती न घेता कुणाच्यातरी सांगण्यावरून पैसे गुंतवू नका.त्यामुळे नुकसान होण्याचा धोका खूप जास्त असतो. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी शेअर मार्केटबद्दल चांगले ज्ञान मिळवा.कोणत्याही कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याआधी त्या कंपनीचा चांगला अभ्यास करावा. त्या शेअरच्या तांत्रिक आणि मूलभूत बाबींचे ज्ञान घ्यावे.आणि मगच त्यात गुंतवणूक करावी.
वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल, वेबसाइट्सवरून शेअर बाजाराची माहिती मिळवता येते. शेअर मार्केटशी संबंधित पुस्तक वाचू शकता.वाटल्यास एखादा कोर्स ही करू शकता. एकदा शेअर मार्केटबद्दल जाणून घेतल्यानंतर, तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता.
Share Market Tips in Marathi – प्लानिंग करा
तुम्ही शेअर मार्केटमध्ये किती पैसे गुंतवणार आहात आणि किती काळासाठी हे ठरवा जेणेकरून तुम्हाला चांगले नियोजन करता येईल. नियोजनाशिवाय पैसे गुंतवू नयेत. तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल किंवा जास्त काळ गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही त्यानुसार प्लॅनिंग करा.तुमचं प्लॅनिंग दुसऱ्याचं ऐकून किंवा इतरांना पाहून करू नका.
Share Market Tips in Marathi – चांगल्या कंपनी मध्ये पैसे गुंतवा
चांगल्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी. कोणतीही कंपनी निवडण्यापूर्वी त्या कंपनीची चांगली माहिती घेतली पाहिजे.कंपनीचा मालक कोण आहे, कंपनीवर किती कर्ज आहे, कंपनी कोणकोणत्या क्षेत्रात काम करते,कंपनीला मागील वर्षात किती नफा,तोटा झाला आहे, अशा विविध बाबींची माहिती घ्यावी.
Share Market Tips in Marathi – लाँग टर्म इनवेसमेंट करा
लोक झटपट पैसे कमाण्याच्या नादात ट्रेडिंग करतात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात.
शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक(लाँग टर्म इनवेसमेंट) ही सर्वोत्तम मानली जाते.तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे गमावण्याचा धोका खूप कमी होतो.परंतु जर तुम्ही ट्रेडिंग केले तर खूप नुकसान होऊ शकते.जगभरातील जे जे यशस्वी व मोठे गुंतवणूकदार आहेत ते सगळे दिर्घकालीन गुंतवणूक(लाँग टर्म इनवेसमेंट करूनच यशस्वी बनलेले आहेत.
Share Market Tips in Marathi – स्वतःवर नियंत्रण ठेवा
शेअर बाजारात गुंतवणूक करताना स्वतःवर नियंत्रण असायला हवे. शेअर बाजारात शेअर्सचे किमतीमध्ये चढ-उतार होत राहतात त्यामुळे घाईघाईने,भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला शिस्त आणि संयम ठेवावा लागेल.भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेतल्यास तुमचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
वॉरन बाफे यांनी म्हटले आहे की ‘शेअर मार्केट पैशाला असंयमी व्यक्तींकडून संयमी व्यक्तींकडे हस्तांतरण करण्याचे काम करणारे यंत्र आहे.’
Share Market Tips in Marathi – कर्ज काढून पैसे गुंतवू नका
कर्ज काढून किंवा उधार पैशांवर कधीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये.वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर शेअर्स अजिबात खरेदी करू नका.
कारण जर तुम्हाला मार्केटमध्ये मध्ये नुकसान झाले तर तुम्ही अडचणीत सापडले जाऊ शकता.
Share Market Tips in Marathi – विविध क्षेत्रात गुंतवणूक करा
आपल्या पोर्टफोलिओ मध्ये एकाच सेक्टर मधील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू नका. यामुळे नुकसान होण्याचा धोका वाढतो. विविध सेक्टर्स जसे आयटी,ऑटोमोबाईल, एफएमजीसी, केमिकल, बँकिंग, नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन्स, कम्युनिकेशन, रिअल इस्टेट, फार्मा, ऑइल, ऍग्रीकल्चर इत्यादी पैकी काही क्षेत्र निवडून त्या क्षेत्राचा पुढील विकास आणि वाढ याचा अभ्यास करून तुम्ही गुंतवणुक करू शकता.
Share Market Tips in Marathi – अफवांवर विश्वास ठेवू नका
शेअर मार्केटमध्ये अफवांवर विश्वास ठेऊ नका. बाजारात ऑपरेटर सक्रिय असतात कधीकधी ते वेगवेगळ्या बातम्या पसरवून शेअरचे भाव खाली किंवा वर नेण्याचा प्रयत्नात असतात. त्यामुळे बाजारातील अफवा पसरविणाऱ्या बातम्यांची योग्य पद्धतीने खातरजमा करून घ्यावी.
शेअर निवडताना इकडच्या तिकडच्या टिप्स किंवा मेसेजकडे लक्ष देऊ नका. शिवाय कोणत्याही बातम्यांद्वारे निर्णय घेऊ नका.
निष्कर्ष – Share Market Tips in Marathi
मला अशा आहे की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचा या टिप्स नक्की (Share Market Tips in Marathi) आवडल्या असतील.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.
- हे सुद्धा वाच