गेल्या एक वर्षांमध्ये, तुम्ही ‘ब्लॉकचेन’ हा शब्द सातत्याने ऐकला असेल जर तुम्ही बिटकॉइन, एथेरियम किंवा अन्य कोणत्या क्रिप्टोकरन्सी बद्दल माहिती घेत असाल.ब्लॉकचेन हे बिटकॉइन तसेच अन्य बऱ्याच क्रिप्टोकरन्सीमागील प्रमुख तंत्रज्ञान आहे.तुम्ही स्वतःला विचारत असाल,ब्लॉकचेन म्हणजे काय?(What is Blockchain in Marathi).
ब्लॉकचेन म्हणजे काय? | What is Blockchain in Marathi
ब्लॉकचेन हे एक वितरित डिजिटल लेजर आहे. डिजिटल लेजर म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्कवर अनेक ठिकाणी संग्रहित व्यवहार किंवा डेटाचे डिजिटल रेकॉर्ड.हे रेकॉर्ड अपरिवर्तनीय असतात.म्हणजेच एकदा झालेला रेकॉर्ड बदलता येत नाहीत. लेजरवरील प्रत्येक व्यवहार किंवा रेकॉर्ड “ब्लॉक” मध्ये संग्रहित केले जाते.
ब्लॉकमध्ये असलेली माहिती मागील ब्लॉकमधील माहितीवर अवलंबून असते आणि त्याच्याशी जोडलेली असते.त्यानंतर व्यवहारांची एक साखळी(chain) बनून जाते.म्हणून ब्लॉकचेन हा शब्द वापरला आहे.
ब्लॉकचेन हे एक रेकॉर्ड-कीपिंग तंत्रज्ञान आहे जे सिस्टम हॅक करणे किंवा त्यावर संग्रहित डेटा खोटा बनवणे अशक्य बनवते, ज्यामुळे ते सुरक्षित आणि व कोणताही बदल न करता येणारे बनते.
ब्लॉकचेन चे प्रकार | Types of Blockchain in Marathi
1) पब्लिक ब्लॉकचेन
पब्लिक ब्लॉकचेन हे ओपन आणि विकेंद्रित असे संगणकाचे नेटवर्क असतात.ज्यांना व्यवहाराची विनंती किंवा प्रमाणीकरण करायचे आहे अशा कोणालाही ते एसेसिबल असतात.जे व्यवहार प्रमाणित करतात त्यांना बक्षिसे मिळतात.व्यवहार प्रमाणित करणाऱ्याला मायनर म्हणतात.बिटकॉईन आणि एथेरियम ब्लॉकचेन हे पब्लिक ब्लॉक चेन चे उदाहरण आहेत.
2) प्रायव्हेट ब्लॉकचेन
प्रायव्हेट ब्लॉक चेन हे पब्लिक ब्लॉक चेन सारखे ओपन नाहीत, त्यांना प्रवेश निर्बंध असतात. ज्या लोकांना ब्लॉक चेन मध्ये सामील व्हायचे आहे त्यांना सिस्टम प्रशासकाची परवानगी आवश्यक असते. ते सामान्यत: एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेद्वारे नियंत्रित असतात, म्हणजे ते केंद्रीकृत असतात. उदाहरणार्थ,हे हायपरलेजर एक प्रायव्हेट, परवानगी ची गरज लागणारे ब्लॉकचेन आहे.
3) हायब्रीड ब्लॉकचेन
हायब्रीड ब्लॉकचेन हे पब्लिक आणि प्रायव्हेट ब्लॉकचेन चे कॉम्बिनेशन आहे.यांमध्ये केंद्रित आणि विकेंद्रित असे दोन्ही फीचर असतात.उदाहरण. एनेर्जी वेब फाऊंडेशन
4) साईड चेन
साइडचेन ही मुख्य चेन ला समांतर चालणारी ब्लॉकचेन आहे. साईड चेन वापरकर्त्यांना दोन भिन्न ब्लॉकचेन दरम्यान डिजिटल मालमत्ता हलविण्याची परवानगी देते.त्यामुळे स्केलेबिलिटी आणि कार्यक्षमता सुधारते.साइडचेनचे उदाहरण म्हणजे लिक्विड नेटवर्क.
ब्लॉकचेन का प्रसिद्ध होत आहे? | Why Blockchain is Popular in Marathi
रोजच्या जीवनात डेटा आणि व्यवहारांची नोंद ठेवणे हा व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बर्याचदा, ही माहिती घरबसल्या हाताळली जाते.अथवा ब्रोकर, बँकर्स किंवा वकील यांसारख्या तृतीय पक्षाद्वारे हाताळली जाते.त्यामुळे व्यवसायात वेळ, खर्च किंवा दोन्ही वाढू शकतो.परंतु, ब्लॉकचेन ही दीर्घ प्रक्रिया टाळते आणि व्यवहाराची जलद हालचाल सोपी करते.त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते.
ब्लॉकचेन हे फायनान्स, सप्लाय चेन, मॅन्युफॅक्चरिंग इत्यादीसारख्या अनेक क्षेत्रातील विविध उद्योगांशी संबंधित ऍप्लिकेशन साठी सक्षम तंत्रज्ञान आहे.ब्लॉकचेन हे एक नव्याने उदयास आलेले तंत्रज्ञान आहे ज्याचे वाढत्या डिजिटल जगात अनेक फायदे आहेत.
ब्लॉकचेन चा इतिहास | History of Blockchain in Marathi
- अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि क्रिप्टोग्राफर डेव्हिड चाउम यांनी 1982 ला ब्लॉकचेन सारखा प्रोटोकॉल प्रथम प्रस्तावित केला होता.
- 1991 मध्ये, स्टुअर्ट हेबर आणि डब्ल्यू. स्कॉट स्टॉर्नेटा यांनी क्रिप्टोग्राफीद्वारे सुरक्षित केलेल्या ब्लॉक्सच्या साखळीचे वर्णन केले.त्यानंतर काही व्यक्तींनी डिजिटल चलने विकसित करण्यावर काम करण्यास सुरुवात केली.
- 2008 मध्ये, सातोशी नाकामोटो या टोपणनावाने काम करणार्या एका व्यक्तीने अथवा संस्थेने एक श्वेतपत्र प्रकाशित केले ज्याने ब्लॉकचेनसाठी मॉडेल स्थापित केले. 2009 मध्ये, सातोशी नाकामोटो यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून बिटकॉइन ही क्रिप्टोकरंसी प्रस्थापित केली.
ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी चे फायदे | Benefits of Blockchain in Marathi
विश्वासार्हता
ब्लॉकचेन अपरिवर्तनीय असते. एकमेकांना ओळखण्याची गरज नसलेल्या व्यक्ती किंवा संस्थेमधील विश्वसनीय व्यवहार स्वयंचलित करते.व्यवहार करणाऱ्या दोन्ही बाजुंकडून अटी पूर्ण केल्यावरच व्यवहार केले जातात.
व्यवहार थांबवता किंवा बदलता येत नाही
एकदा ब्लॉकचेन प्रोटोकॉलमध्ये प्रोग्राम केलेल्या अटी पूर्ण झाल्यानंतर, सुरू केलेला व्यवहार पूर्ववत केला जाऊ शकत नाही.याशिवाय व्यवहार बदलला किंवा थांबवला जाऊ शकत नाही. कोणतीही बँक, सरकार किंवा तृतीय पक्ष व्यवहार थांबवू किंवा बदलू शकत नाही.
अपरिवर्तनीय
ब्लॉकचेनवरील रेकॉर्ड बदलले जाऊ शकत नाहीत. रेकॉर्ड शी कोणतीही छेडछाड केली जाऊ शकत नाही.कठीण असे गणिती प्रॉब्लेम सोडवल्यानंतर आणि व्हेरिफाय केल्यानंतरच व्यवहारांचा नवीन ब्लॉक जोडला जातो. प्रत्येक नवीन ब्लॉकमध्ये एक युनिक क्रिप्टोग्राफिक की असते.
विकेंद्रित
कोणतीही एक व्यक्ती किंवा संस्था ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी राखत नाही.ब्लॉकचेनवरील निर्णय सर्वसहमतीने घेतले जातात.विकेंद्रीकरण अत्यावश्यक आहे असे मानले जाते कारण लोक सहजपणे प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतात.
पारदर्शक
पब्लिक ब्लॉकचेन हे मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर आहेत.पब्लिक ब्लॉक चेन मध्ये व्यवहार आणि त्यांचा स्रोत कोड पाहण्यासाठी कोणीही प्रवेश करू शकतो.तो स्त्रोत कोड नवीन ऍप्लिकेशन बनवण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
पीअर-टू-पीअर
बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीज, तुम्हाला जगात कुठेही, बँक किंवा संस्थेच्या मध्यस्थाशिवाय कोणालाही थेट पैसे पाठवू देतात
ब्लॉकचेन चे तोटे | Disadvantages of Blockchain in Marathi
पर्यावरणावर परिणाम
बिटकॉइन सारखे ब्लॉकचेन नेटवर्क व्यवहारांचे प्रमाणीकरण करण्यासाठी भरपूर वीज वापरतात. ज्यामुळे पर्यावरणाची चिंता निर्माण होते. उदाहरणार्थ, बिटकॉइन एका मध्यम आकाराच्या युरोपियन देशापेक्षा जास्त वीज वापरतो.
वैयक्तिक जबाबदारी
जेव्हा तुम्ही क्रिप्टोकरन्सी खरेदी करून सार्वजनिक मुक्त-स्रोत ब्लॉकचेनमध्ये गुंतवणूक करता. आणि ते तुमच्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये साठवता.त्या वॉलेट साठी एक सीक्रेट की असते.ती जर तुम्ही विसरलात तर तुमच्या वॉलेट मधील क्रिप्टोकरन्सी तुम्ही कधीच परत मिळऊ शकत नाही.
ब्लॉकचेन म्हणजे काय? | What is Blockchain in Marathi
ब्लॉकचेन हे एक वितरित डिजिटल लेजर आहे. डिजिटल लेजर म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्कवर अनेक ठिकाणी संग्रहित व्यवहार किंवा डेटाचे डिजिटल रेकॉर्ड.हे रेकॉर्ड अपरिवर्तनीय असतात.म्हणजेच एकदा झालेला रेकॉर्ड बदलता येत नाहीत. लेजरवरील प्रत्येक व्यवहार किंवा रेकॉर्ड “ब्लॉक” मध्ये संग्रहित केले जाते.
ब्लॉकचेन चे प्रकार | Types of Blockchain in Marathi
पब्लिक ब्लॉकचेन,प्रायव्हेट ब्लॉक चेन, हायब्रीड ब्लॉकचेन,साईड चेन हे ब्लॉक चेन चे चार प्रकार आहेत.
निष्कर्ष
आजही अनेकांसाठी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान अजूनही एक रहस्य किंवा अगदी भीतीदायक विषय आहे.आपण भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर करू याविषयीही काहींना शंका आहे.आणि हा संशय समजण्यासारखा आहे कारण आपण अजूनही ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा विकास आणि व्यापक अवलंब करण्याच्या प्रारंभिक टप्प्यात आहोत असे म्हणले तरी चूकीचे ठरणार नाही.
मला अशा आहे की आता तुम्हाला ब्लॉकचेन म्हणजे काय?(What is Blockchain in Marathi) याबाबत ची माहिती आवडली असेल.
जर तुम्हाला ब्लॉकचेन म्हणजे काय?( Blockchain information in Marathi) बद्दलचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.
जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही बदल सुचवायचे असतील किंवा तुमची काही शंका असेल तर कॉमेंट करा.मी नक्की रिप्लाय देईन.