म्युच्युअल फंडाचे 7 जबरदस्त फायदे | Mutual Fund Benefits in Marathi
म्युच्युअल फंड योजना ही एक प्रकारची आर्थिक गुंतवणूक योजना आहे(Mutual Fund in Marathi). यामध्ये गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले जातात. तो पैसा म्युच्युअल फंड कंपन्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स, बाँड्स, स्टॉक्स, डेट आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात.
म्युच्युअल फंड कंपन्या वेगवेगळ्या गुंतवणुक क्षेत्रात निधीचे वाटप करतात. म्युच्युअल फंडातील तुमची गुंतवणूक व्यावसायिक फंड मॅनेजर द्वारे व्यवस्थापित केली जाते. हा फंड मॅनेजर विविध सिक्युरिटीजचे विश्लेषण करतो आणि तुमच्या वतीने त्यामध्ये गुंतवणूक करतो.
गुंतवणुकीतून मिळणारा नफा गुंतवणूकदारांमध्ये वितरीत केला जातो. तो गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीद्वारे त्यांची संपत्ती वाढवण्यास मदत करतो.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत जसे की विविधीकरण, पारदर्शकता आणि तरलता. आज आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय फायदे आहेत?(Mutual Fund Benefits in Marathi) याबाबत माहिती घेणार आहोत.
तज्ञ व्यवस्थापन – Mutual Fund Benefits in Marathi
नवीन गुंतवणूकदाराला गुंतवणूक कशी आणि कुठे करावी याची फारशी कल्पना नसते.
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे ते तज्ञांद्वारे व्यवस्थापित केले जातात. हे तज्ञ वेगवेगळ्या कंपन्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करतात आणि योग्य गुंतवणूक निवडतात. गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून ते पैसे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.
गुंतवणुकीत येणाऱ्या सर्व आव्हानांची काळजी फंड मॅनेजर घेतो. तुम्हाला फक्त गुंतवणुक करण्याची गरज असते बाकी मग त्या गुंतवणुकीची तज्ञांकडून काळजी घेतली जाईल. म्युच्युअल फंडाचा हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे.
विविधता – Mutual Fund Benefits in Marathi
गुंतवणुकीच्या प्राथमिक नियमांपैकी एक म्हणजे गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे. त्यामुळे म्युच्युअल फंड हा एक सोपा मार्ग असू शकतो ज्याद्वारे गुंतवणुकीत विविधता आणता येईल.
विविधीकरणामध्ये आपला गुंतवणुकीचा पैसा वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवला जातो. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुमचा फंड मॅनेजर तुमचा पैसा इक्विटी, स्टॉक, डेट फंड आणि इतर विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवतो.
हे आपल्याला एक चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत करते. आणि आपला गुंतवणुकीत मधील धोका देखील कमी करतो.
हे देखील शक्य आहे की जर एक सिक्युरिटीजची गुंतवणूक दुसर्याप्रमाणे चांगली कामगिरी करत नसेल, तर ते एकमेकांना संतुलित करतात, तुमची जोखीम कमी करतात आणि तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित करतात.
कमी पैशात सुरुवात – Mutual Fund Benefits in Marathi
म्युच्युअल फंडात, तुम्ही 100 रुपयांत गुंतवणूक सुरू करू शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही.
एसआयपी करून तुम्ही दर महिन्याला ठराविक अशी छोटी रक्कम गुंतवू शकता.त्यामुळे, तुम्हाला सतत मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याची चिंता करण्याची गरज नाही.
आणि तुम्हाला नियमित गुंतवणुकीची सवयही लागेल.
तरलता – Mutual Fund Benefits in Marathi
तरलता म्हणजे केलेली गुंतवणुक विकून त्यातून पैसे मिळवणे. समजा तुमच्याकडे आणीबाणी आहे. आणि तुम्हाला पैशांची गरज आहे.परंतु तुमच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नाहीत.मालमत्ता विकून किंवा कर्ज काढून लगेच पैसे उभे करणे शक्य नाही. परंतु म्युच्युअल फंडामध्ये, तुम्हाला तुमचे पैसे त्वरित काढण्याचे स्वातंत्र्य असते.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही उच्च तरलता असलेली गुंतवणुक म्हणून ओळखली जाते. जेव्हा केव्हा तुम्हाला पैशाची गरज असेल तेव्हा ते सहजपणे रोखीत रूपांतरित केले जाऊ शकते.
सुरक्षित आणि पारदर्शक – Mutual Fund Benefits in Marathi
सर्व म्युच्युअल फंड सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे नियंत्रित केले जातात. याचा अर्थ सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांनी सेबीने दिलेल्या विविध आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे.याशिवाय, सेबीने सर्व म्युच्युअल फंडांना दर महिन्याला त्यांचे पोर्टफोलिओ दाखवणे बंधनकारक केले आहे.
गुंतवणूकदार फंड मॅनेजर, त्यांची पात्रता, वर्षांचा अनुभव आणि एयूएम, फंड हाउसचे सॉल्व्हेंसी तपशील तुम्ही तपासू शकता.त्यामुळे म्युच्युअल फंड बद्दल सर्व माहिती आपल्याला मिळते.
तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या मूल्याविषयी नियमित माहिती मिळते. म्युच्युअल फंड योजनेशी संबंधित कागदपत्रे गुंतवणूक धोरण आणि पोर्टफोलिओ यांची माहिती देतात.
यामुळे म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित व पारदर्शक बनतात.
विविध आर्थिक ध्येयासाठी गुंतवणुक योजना – Mutual Fund Benefits in Marathi
तुम्ही तुमच्या ध्येयांशी जुळणाऱ्या म्युच्युअल फंड योजना शोधू शकता. तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि तुमच्या गुंतवणुकीच्या क्षितिजानुसार तुम्ही योजना निवडू शकता.
गुंतवणूकदार त्यांच्या जोखीम प्रोफाइल आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांमधून निवडू शकतात. इक्विटी फंड, हायब्रीड फंड, डेट फंड, लिक्विड फंड आणि कर बचत योजना इत्यादी विविध गुंतवणुकीमधून म्युच्युअल फंड निवडू शकतात.
सुलभ गुंतवणूक – Mutual Fund Benefits in Marathi
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे आता पूर्वीपेक्षा अतिशय सुलभ बनले आहे.
काही मिनिटांत, तुम्ही घरबसल्या ऑनलाइन म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूक करू शकता.बँकेच्या वेबसाईट वरून सुद्धा म्युच्युअल फंड घेऊ शकता.
निष्कर्ष – म्युच्युअल फंडाचे 7 जबरदस्त फायदे | Mutual Fund Benefits in Marathi
जर तुम्हाला म्युच्युअल फंडाचे 7 जबरदस्त फायदे(Mutual Fund Benefits in Marathi) याबद्दल ची माहिती आवडली असेल तर मित्रांना,सोशल मीडिया मध्ये जरूर शेअर करा.
जर तुमचे काही प्रश्न असतील,किंवा या पोस्ट मध्ये बदल सुचवायचे असतील तर नक्की कमेंट करा. धन्यवाद!
- हे देखील वाचा: