उंधियु रेसिपी | Undhiyu Recipe in Marathi
उंधियु ही गुजराती मिक्स भाजी आहे जी गुजरातची प्रादेशिक वैशिष्ट्य आहे.
उंधियु ही एक अतिशय स्वादिष्ट, अतिशय चवदार भाजी आहे जी अनेक प्रकारच्या भाज्या मिक्स करून आणि भरपूर मसाले घालून तयार केली जाते.
ही रेसिपी जास्त करून हिवाळ्यात तयार केली जाते जेव्हा उंधीयु भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. दिवाळी आणि उत्तरायण यांसारख्या खास प्रसंगी उंधियु बनवतात.सर्व कौटुंबिक कार्यातही याला महत्त्व असते.
साहित्य
पाव किलो सुरती पापडी (कोवळी),पाव किलो सुरती पापडी जून (दाणेवाली),पाव किलो तुरीच्या शेंगा,पाव किलो रताळी,पाव किलो बटाटे,पाव किलो सुरण,पाव किलो कोनफळ,अर्धा किलो वांगी,कोथिंबीर,3 अर्धवट पिकलेली केळी,1 मेथीची जुडी,2 वाट्या डाळीचे पीठ,2 टीस्पून मिरची पावडर,1/4 टीस्पून हळद,2 टीस्पून गोडा मसाला,2 टीस्पून धने जिरे पावडर,अडीच टीस्पून मीठ,चिंच,एक सपाट वाटी गूळ,पाऊण वाटी तेल.
वाटण
अर्धा वाटी ओलं खोबरं,5-6 हिरव्या मिरच्या,7-8 लसूण पाकळ्या.सर्व एकत्र बारीक वाटावे.
फोडणी
1/2 टीस्पून मोहरी,1/4 टीस्पून हिंग,2 टीस्पून ओवा.
कृती
मेथी चिरून त्यात 1/2 तिखट,1/2 मीठ,1 टीस्पून धने जिरे पावडर,थोडी चिंच, थोडे गुळ, थोडी हळद घालून एकत्र करावे.
नंतर त्यात डाळीचे पीठ घालून एकत्र करावे व त्याचे सुपारी एवढे गोळे करून कूकर मधून उकडून काढावेत.थंड झाल्यावर तळावेत.
सर्व भाज्या मोठे तुकडे करून चिराव्यात.
केळी सालासह गोल चिरावित.पातेलीत तेल तापल्यावर त्यात फोडणीचे मसाले घालावेत व त्यावर हळद,दीड टीस्पून तिखट,गोडा मसाला, धने जिरे पावडर घालून परतावे.
त्यावर सर्व भाज्या घालून परताव्यात.त्यात वाटलेला मसाला,गुळ,चिंच,2 टीस्पून मीठ,कोथिंबीर घालून सर्व ढवळावे व भाजी मंद गॅसवर शिजू द्यावी.
भाज्या शिजल्या की गॅस बंद करावा.भाजी वाढण्यापूर्वी थोडा आधी त्यात तळलेले मेथीचे गोळे घालून एकत्र करावे.
- हे सुद्धा वाचा